Marathwada BJP News : फडणवीसांकडून कराडांना `लिफ्ट`; संभाजीनगरातील विकासकामांना दिली गती...

Marathwada Political News : ही विकासकामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Marathwada BJP News
Marathwada BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. कराड यांनी गेल्या वर्षभरापासून त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. (Marathwada BJP News) लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली असताना जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा दृष्टीने मुंबईत आज महत्त्वाची बैठक पार पडली.

Marathwada BJP News
Eknath Khadse On BJP:...तेव्हा भाजपने सनातन धर्म खुंटीवर टांगला होता का ?; एकनाथ खडसेंचा सवाल

पैठण येथील जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॉट ऊर्जानिर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (एनटीपीसीचे) महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis) तसेच पक्षी अभयारण्य आणि पर्यावरण याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करून पर्यावरण, स्थानिक पातळीवरील अडचणी, पक्षी अभयारण्य आरक्षण याबाबत खासगी संस्थामार्फत सर्वेक्षण करून घ्यावे.

आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. (BJP) त्यानंतर हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल आणि याबाबतच्या पर्यावरणविषयक परवानगीसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. (Dr.Bhagwat Karad) छत्रपती संभाजीनगर शहराचा सध्या होत असलेला विस्तार, वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जालना रोडवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहत फ्लाय ओव्हर ब्रीज याबाबत माहिती घेण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही विकासकामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या. देवेंद्र फडणवीस, डाॅ. कराड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती देण्याचे आदेश देत फडणवीसांनी एक प्रकारे कराडांना `लिफ्ट`, दिल्याचे बोलले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलार, डी.एम.आय.सी.मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रिज या कामाचा देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

या विकासकामांना गती द्यावी, अशा सूचनाही या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला, वन विभागाचे प्रधान सचिव वेनुगोपाळ रेड्डी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित(एनटीपीसीचे) व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) साळुंके, डॉ. कराड यांचे खासगी सचिव अमित मीना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com