Jalgaon News: "काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी भाजपने सनातन धर्म खुंटीला टांगून ठेवला होता का," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे जळगाव दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या संपर्क ते समर्थन अभियानाचा समारोप करताना त्यांनी 'इंडिया आघाडी'वर जोरदार टीका केली होती. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मासंदर्भात केलेल्या विधानाशी एकनाथ खडसे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, जर त्यांना त्यांची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे अवाहन बावनकुळेंनी केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बावनकुळे यांच्या या टीकेला उत्तर देताना खडसेंनी भाजपवर जोरदार टीका केली. "चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना प्रश्न विचारावा की, काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन करून संसार केला. त्यावेळी मेहबूबा मुफ्ती यांना सनातन धर्म मान्य होता का ? की, भारतीय जनता पक्षाने सनातन धर्म खुंटीला टांगून ठेवला होता," असा सवाल त्यांनी केला.
ड्रग्जमाफिया ललित पाटीलचे (Lalit Patil) कनेक्शन उघड करा, अशी मागणीही या वेळी खडसे यांनी केली. ललित पाटील प्रकरणात सरकारमधीलच मंत्री व नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचे नाशिक व चाळीसगाव येथील कनेक्शन उघड करा, या ठिकाणी तो कोणाच्या सोबत राहत होता, कोणाला भेटला, हे सरकारने जाहीर करावे, मंत्र्यांचा संबंध असल्याशिवाय ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार होऊच शकत नाही, यात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या सहभागाचीही तपासणी करावी, असं खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.