Uddhav Thackdray Speech News, Jalna
Uddhav Thackdray Speech News, JalnaSarkarnama

Marathwada : साहित्य संमेलनातही खोक्यांचीच चर्चा ; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा..

Uddhav Thackeray : लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये असे आहे का?
Published on

Uddhav Thackeray : घनसावंगी येथे आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा Shivsena शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ठाकरेंनी लोकशाही संपत असल्याचा दाखला देत खोक्यांची चर्चा केली.

Uddhav Thackdray Speech News, Jalna
Chandrakant Patil : आधी राज्यपाल, आता चंद्रकांतदादा अन् पुन्हा औरंगाबाद..

राज्यातील सत्तांतरांपासून शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, मंत्र्यांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला जातो. (Uddhav Thackray)आज साहित्य संमेलनात देखील या खोक्यांची चर्चा दिसून आली. (Marathwada) त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर होणारा ५० खोक्यांचा आरोप आता साहित्य संमेलनात देखील गाजू लागला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते काय भाष्य करतात याकडे साहित्यिकांप्रमाणेच राजकारण्यांचे देखील लक्ष लागले होते.

खोके देऊन लोकं आपल्याकडे आणली जात असतील आणि खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये असे आहे का? आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठे जाणार आहे.

ट्रॅव्हल एजन्सी सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालेल, अशी लोकशाही आपण मानणार नाही, असे सुनावताच लोकशाहीचा अर्थ असा लावणार असाल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackdray Speech News, Jalna
Cabinet Expansion: शिंदे गटाच्या आमदारांचा जीव पुन्हा टांगणीला : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'या' कारणांमुळे पुन्हा हुकणार?

एकंदरित महाविकास आघाडी सरकार पाडायला कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदार, मंत्र्यांबद्दल असलेली चीडच ठाकरेंनी साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावरून व्यक्त केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आता विरोधक या टीकेकडे कसे पाहता? ते उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com