Dilip Gawade: सामाजिक सलोखा राखण्यासाठी समन्वयाने काम करणार; विभागीय आयुक्त गावडेंनी पदभार स्वीकारला..

Marathwada Divisional Commissioner Dilip Gawde News:प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनीयार यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी गावडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
Dilip Gawade
Dilip GawadeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: आरक्षणाच्या प्रश्नवारून मराठवाड्यात दोन समाजात निर्माण होत असलेली दरी पाहता मराठवाड्यातील शेती, टंचाई परिस्थितीवर काम करतांनाच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, नवे विभागीय आयुक्त दिलीप गावडे (Dilip Gawade)यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी काल नियुक्ती झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला.

प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनीयार यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी गावडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर विविध विभाग प्रमुखांशी संवाद साधतांना दिलीप गावडे यांनी मराठवाडयातील शेती, टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करूया, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात विशेषतः मराठवाड्यात सध्या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये, याची काळजी राज्य पातळीवर सरकार आणि जिल्हा व विभागीय पातळीवरील प्रशासनाकडून घेतली जात आहे. दिलीप गावडे यांनी विभागीय आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर याच मुद्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे सुतोवाच केले.

Dilip Gawade
Lok Sabha Speaker Om Birla: सहा वर्षांपूर्वी राहुल गांधींची मोदींसोबत गळाभेट, आता 'शेक हँड'; सभागृहात टाळ्यांचा कडकडाट..

गावडे यांनी पदभार स्वीकारल्यामुळे मराठावाड्यातील शेती, पाणी टंचाई, सिंचनाचे प्रकल्प या विषयांना गती मिळणार आहे. गेल्या पंचवीस दिवसापासून विभागीय आयुक्तपद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत शासनाला तातडीने विभागीय आयुक्त पदावर नेमणूक करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानूसार काल सरकारने दिलीप गावडे यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.

Dilip Gawade
Varsha Bungalow: 'वर्षा' बंगल्यावर बैठकांचा धडाका सुरु; मध्यरात्री दोन तास खलबते

गावडे हे 1990 मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाले होते. वाई येथे प्रांत अधिकारी, पुणे येथे राजशिष्टाचार विभागात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, विदर्भात एमआयडीसीचे सीईओ पदावर त्यांनी काम केले आहे.

2007 मध्ये त्यांना आयएएस पदावर बढती मिळाल्यानंतर गोंदिया जि.प.सीईओ, अहिल्यादेवीनगर येथे मनपा आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com