Bjp News : भाजप खासदारानं उडविला स्वपक्षीय आमदाराच्याच पॅनलचा धुव्वा

National Institute Education Election : हे दोन्ही नेते एकेकाळी जिवलग मित्र होते...
Unmesh patil, Mangesh chavan
Unmesh patil, Mangesh chavanSarkarnama
Published on
Updated on

National Institute Education Election News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, तालुक्यातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण पुरस्कृत विद्यमान सचिव वृक्षमित्र अरुण निकम यांच्या विकास पॅनलचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत भाजप खासदार उन्मेष पाटील पुरस्कृत संस्थेचे माजी चेअरमन डॉ. विनायक चव्हाण यांच्या नानासाहेब य. ना. चव्हाण स्मृती पॅनलने १९ पैकी १७ जागांवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत खासदार उन्मेष पाटील यांचे वडील भय्यासाहेब पाटील हे डॉ. चव्हाण यांच्या पॅनलतर्फे उभे होते. त्यांनी आपले सर्व लक्ष या निवडणुकीवर केंद्रीत केल्यामुळेच तेच या विजयाचे शिल्पकार ठरले

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या या निवडणुकीत तीन पॅनल उभे होते. प्रमुख लढत भाजप(BJP) खासदार उन्मेष पाटील पूरस्कृत डॉ. विनायक चव्हाण व आमदार मंगेश चव्हाण पूरस्कृत अरुण निकम यांच्या पॅनलमध्ये होती. काल (ता. ८) मतदान झाल्यानंतर आज सकाळी आठला हिरापूर रोडवरील महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत डॉ. विनायक चव्हाण यांच्या पॅनलचे पाचही उमेदवार विजयी झाले. यात अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून महेश चव्हाण हे विजयी झाली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी विश्वास चव्हाण यांच्यापेक्षा ३४९ मते जास्त मिळवली. महेश चव्हाण यांना १ हजार ४१७ तर विश्वास चव्हाण यांना १ हजार ६८ मते मिळाली.

महेश चव्हाण हे माजी वनमंत्री स्वर्गीय डी. डी. चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. तर विश्वास चव्हाण हे माजी नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांचे पती असून संस्थेचे विद्यमान संचालक आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त अभियंता सोनुसिंग ठाकरे (राजपूत) हे विजयी झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संजय रतनसिंग पाटील यांच्यापेक्षा २६१ मते जास्तीची घेतली. श्री. ठाकरे यांना १ हजार ४०३ तर श्री. पाटील यांना १ हजार १४२ मते मिळाली.

Unmesh patil, Mangesh chavan
Supreme Court: शिंदे फडणवीस सरकार जाणार की राहणार ? सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी

ठाकरे हे राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांचे पती आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून भाऊसाहेब पाटील हे विजयी झाले. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार शेषराव पाटील यांच्यापेक्षा ३४६ मते जास्तीची प्राप्त झाली. भाऊसाहेब पाटील हे संस्थेचे माजी संचालक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महारु म्हसू पाटील तथा हाजीसाहेब यांचे सुपुत्र व पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांचे वडील आहेत.

महिला राखीव गटातून अलका बोरसे या १ हजार २६१ तर पुष्पा भोसले या १ हजार १६९ मतांनी विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी पॅनलच्या नयनाबाई पाटील यांना १ हजार १६) व अनुपमा सूर्यवंशी यांना ८९३ मते प्राप्त झाली. अरुण निकम यांच्या ‘विकास’ व डॉ. नरेश देशमुख यांच्या ‘परिवर्तन’ पॅनलच्या पाचही उमेदवारांचा पराभव झाला.

Unmesh patil, Mangesh chavan
Pimpri-Chinchwad News: 'आप' पिंपरी पालिका निवडणुकीत कुणाचा गेम करणार; भाजप की राष्ट्रवादी?

या निवडणुकीत शाळेची जागा विक्रीवरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले,त्या मुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष होते.अखेर भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपचेच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर बाजी मारली,हे दोन्ही नेते एकेकाळी जिवलग मित्र होते,आता एकाच पक्षात असून त्यांच्यात विरोध आहे.

सर्वसाधारण जागांचा निकाल

सर्वसाधारण मतदारसंघातील १४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात होते. यात डॉ. विनायक चव्हाण यांच्या पॅनलचे १२ तर अरुण निकम यांच्या पॅनलचे अवघे दोन उमेदवार विजयी झाले. दोन्ही पॅनल प्रमुख विजयी झाले असून, डॉ. चव्हाण यांना १४ उमेदवारांमध्ये सर्वांत जास्त तर खासदार उन्मेष पाटील यांचे वडील भय्यासाहेब पाटील यांना दोन नंबरची मते मिळाली. विकास पॅनलचे प्रमुख अरुण निकम व विकास पाटील (गुढे) हे विजयी झाले. डॉ. चव्हाण यांच्या पॅनलचे शरद मोराणकर व तात्यासाहेब निकम यांचा पराभव झाला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

डॉ. विनायक चव्हाण (१५६४), भय्यासाहेब पाटील (१४८४), प्रमोद पाटील (१४५९), आर्किटेक्ट धनंजय चव्हाण (१३८३), बाळासाहेब चव्हाण (१३७१), ॲड. साहेबराव पाटील (११७९), सुनील देशमुख (११६२), अविनाश देशमुख (११०२), रावसाहेब साळुंखे (१०९०),हंसराज पाटील (१०७४), अरुण निकम( १०४७), विकास पाटील (१०४३), शेनपडू पाटील (१०४०), बारीकराव वाघ (१०२८)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com