Om RajeNimbalkar News: शिंदेंचा खासदार सरकारवरच नाराज..? विरोधकांनी पेटवलेल्या मुद्द्यावर शिवसेनेच्या ओम राजेंनी घेतली धाडसी भूमिका

Karjat Bhimashankar Tree Cutting: राज्यात कर्जत तालुक्यातील 'साई डोंगर' परिसरात टोरंट पॉवर (Torrent Power) कंपनीच्या 3000 मेगावॅट क्षमतेच्या 'पंप स्टोरेज' जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू आहे. हा प्रस्तावित प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. यावरूनच सध्या जोरदार राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.
Omraje Nimbalkar-Aditya Thackeray
Omraje Nimbalkar-Aditya Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Dharashiv News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 'जय महाराष्ट्र'करत सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.या खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची झाली होती. ओम राजेंचा कामाचा झपाटा अन् शैलीमुळे त्यांचा सोशल मीडियावरही मोठी क्रेझ राहिली आहे. याच शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर पहिल्यांदाच ओम राजेंनिंबाळकरांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना थेट विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याचं समोर आलं आहे.

राज्यात कर्जत तालुक्यातील 'साई डोंगर' परिसरात टोरंट पॉवर (Torrent Power) कंपनीच्या 3000 मेगावॅट क्षमतेच्या 'पंप स्टोरेज' जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू आहे. हा प्रस्तावित प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. यावरूनच सध्या जोरदार राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. याच वादावर आता खासदार ओम राजेनिंबाळकरांनी मोठं भाष्य केलं आहे.

शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले, वृक्षतोडीमुळेच पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.या वृक्षतोडीमुळेच महाराष्ट्र अल निनोसारख्या संकटाला तोंड देत आहे. या परिस्थितीमध्ये झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी शंभर ते दीडशे वर्षे लागतात. त्यामुळेच कर्जत तालुक्यातील भीमाशंकर येथे टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड दुर्दैवी असल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

सरकारने एखादा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी एक झाड तोडले तर 100 झाडे लावावी आणि मगच वृक्षतोड करून प्रकल्प उभे करावेत, असं म्हणत शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे.

Omraje Nimbalkar-Aditya Thackeray
viral audio clip controversy : महाराष्ट्राचं राजकारण व्हायरल ऑडिओ क्लिपवरून तापलं, भाजप-शिवसेनेत बिनसलं; राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता!

टोरंट पॉवर प्रोजेक्टसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पर्यावरणवादी,निसर्गप्रेमी सामाजिक संस्था यांच्याकडूनही तीव्र विरोध होत आहे.

यात आता सरकारमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकरांनीही या वृक्षतोडीवर आक्रमक विरोधी भूमिका घेतल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. भीमाशंकर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून येत्या काळात पुन्हा एकदा राजकीय वादाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Omraje Nimbalkar-Aditya Thackeray
Wildlife Sanctuary : कर्जतमधील वृक्षतोडीचा वाद सुरु असतानाचा फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com