Sanjay Shirsat On Marathwada : मराठवाडा आता राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, जे म्हणू तेच होईल..

Shivsena News : विरोधक आमच्यावर टीका करतायेत, पण आम्ही त्याकडे आता गांभीर्याने घेत नाही.
Sanjay Shirsat On Marathwada News
Sanjay Shirsat On Marathwada NewsSarkarnama

Aurangabad Political News : मराठवाडा आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान होवू लागले आहे. राज्यातील नेत्यांचे देखील तेच मत बनले आहे. (Sanjay Shirsat News) त्यामुळे आता `मराठवाडा जो बोलेगा, वही होगा`, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला. लातूर दौऱ्यावर असलेल्या शिरसाट यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

Sanjay Shirsat On Marathwada News
Amarsinh Pandit On Farmers : सरकारी हस्तक्षेप थांबवा, शेतकऱ्यावर हात पसरण्याची वेळ येणार नाही..

विशेष म्हणेज काल मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत होते. (Sanjay Shirsat) त्यानंतर अजित पवारांची बीडमध्ये सभा झाली, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हिंगोलीत सभा घेऊन गेले. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी मराठवाड्याचे महत्व वाढल्याचे विधान केले.

राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचे (Marathwada) महत्व वाढले आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मराठवाडा होतोय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचेही हे मत बनले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे राजकीय वजन वाढले आहे. मराठवाडा जे सांगेल तेच आता होईल.

विरोधक आमच्यावर टीका करतायेत, पण आम्ही त्याकडे आता गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या जनतेसाठी, शेतकरी, मजुर, कामगार, विद्यार्थी महिला अशा सगळ्याच घटकांच्या विकासासाठी झटत आहेत. आम्ही विकास करू, तुम्ही टीका करा, अशी भूमिका या नेत्यांनी आणि सत्तेतील तीन्ही पक्षांची आहे.

अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यावरून काॅंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजून कुणाला घेणार अशी टीका केली. यावर प्रतिक्रिया देतांना आता तुम्ही येऊ नका, म्हणजे मिळवले, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com