Marathwada BJP Politics : मराठवाड्यात भाजपला घरघर; सूर्यकांता पाटील, किन्हाळकर, भालेराव यांच्यानंतर कोणाचा नंबर?

BJP Politics NCP Shivsena : नांदेड भाजपमधून सुरू झालेल्या या आऊटगोईंगचे लोण मराठवाड्यात हळूहळू पसरू लागले आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी ही भाजपला रामराम ठोकत 'तुतारी' हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Suryakanta Patil Raju Shinde Madhavrao Kinhalkar sudhakar bhalerao
Suryakanta Patil Raju Shinde Madhavrao Kinhalkar sudhakar bhaleraosarkarnama

BJP Politics : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यात सपाटून मार खालेल्ल्या भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात घरघर लागली आहे. नांदेड, लातूर, संभाजीनगरसह मराठवाड्यात भाजपचे नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकत असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील पराभव आणि त्याआधी अशोक चव्हाण यांचा झालेला पक्षप्रवेश याचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.

आधी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या घटनेला महिना होत नाही तोच माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांनी भाजपची साथ सोडली. एकापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील दोन नेत्यांनी विधानसभेआधी सीमोल्लंघन केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर संपूर्ण जिल्हा शतप्रतिशत भाजपमय करण्याच्या राज्यातील नेत्यांच्या प्रयत्नांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या पक्षांतराने खीळ बसत आहे. नांदेड भाजपमधून सुरू झालेल्या या आऊटगोईंगचे लोण मराठवाड्यात हळूहळू पसरू लागले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी ही भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या (ता.11) मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होत आहे. इकडे संभाजीनगरमध्ये भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही माजी नगरसेवकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत भाजपला धक्का दिला.

Suryakanta Patil Raju Shinde Madhavrao Kinhalkar sudhakar bhalerao
Radheshyam Mopalwar : प्रशासनात 'मौज' केल्यानंतर राजकारणातही नशीब आजमावणार होते राधेश्याम मोपलवार!

महायुतीमुळे अनेक विधानसभा मतदारसंघातील गणित बदलली आहेत. आपल्याला भाजपमध्ये राहून उमेदवारी मिळणार नाही, याचा अंदाज आलेले अनेक इच्छूक नवा पर्याय शोधत आहेत. राजू शिंदे यांनी याच भूमिकेतून शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतरही राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

यावरून भाजपमध्ये BJP किती अंतर्गत खदखद आहे हे स्पष्ट होते. एकीकडे भाजपचे नेते लोकसभेला जे घडले ते विधानसभेत घडणार नाही, असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसा पक्षांतराचा वेग वाढणार आहे. मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार निवडून आला. इतर सात मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली.

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तापलेले वातावरण, जरांगे पाटील यांनी 288 उमेदवारांना पाडा, असे आवाहन करत निवडणुकीत उमेदवार देण्याची केलेली घोषणा पाहता भाजपला येणाऱ्या काळात अधिक गळती लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, राजू शिंदे यांच्यानंतर कोणाचा नंबर? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Suryakanta Patil Raju Shinde Madhavrao Kinhalkar sudhakar bhalerao
Amol Kolhe On Devendra Fadnavis : शरद पवारांचा नेता म्हणतो,दिल्लीतून पुन्हा एकदा फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com