Radheshyam Mopalwar : प्रशासनात 'मौज' केल्यानंतर राजकारणातही नशीब आजमावणार होते राधेश्याम मोपलवार!

Radheshyam Mopalwar and Politics : राज्य सरकारने वेळोवेळी दिलेली मुदत एकदाची संपल्यानंतर राधेश्याम मोपलवार यांना राजकारणाचे वेध लागले होते. ते महायुतीकडून हिंगोलीतून लोकसभा निवडणूक लढवणार, असे सांगितले जात होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarSarkarnama
Published on
Updated on

Radheshyam Mopalwar News : राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना समृद्धी महामार्गाच्या बांधणीची जबाबदारी सर्वाधिक काळ सांभाळलेले राधेश्याम मोपलवार यांचा राजकारणातही दबदबा होता. राज्य सरकारने वेळोवेळी त्यांना दिलेली मुदतवाढ गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपली. त्यानंतर ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवणार, अशी चर्चा झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोपलवार यांनी 3000 कोटींची माया जमा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मोपलवार यांच्या कृत्यांची, त्यांच्या राजकीय लागेबांध्यांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने देशभरात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. महाराष्ट्रात भाजपने काही मतदारसंघांत निवृत्त किंवा कार्यरत असलेल्या आयएएस, आय़पीएस अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी केली होती.

उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. तशीच चाचपणी हिंगोली लकसभा मतदारसंघातून मोपलवार यांनी केली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar : घोटाळेच घोटाळे! दोन बायका अन् मुलींच्या नावावर बक्कळ पैसा! 'समृद्धी'ने मोपलवार झाले मालामाल

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र ती नंतर रद्द करण्यात आली. पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून मोठा विरोध झाला होता. त्यामुळे मोपलवार महायुतीकडून रिंगणात उतरतात का, याची उत्सुकता लागली होती. मात्र मोपलवारांच्या नावाची चर्चा हवेतच विरली. त्यांना उमेदवारी मिळाली नाही. रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मोपलवार यांना सातवेळा मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे सरकारदरबारी त्यांचे चांगलेच वजन होते.

त्याचाच वापर करून ते लोकसभेला उमेदवारी मिळवतील, असा अंदाज बांधला जात होता. शिवाय, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून दरवेळी नवीन उमेदवाराला निवडून दिले जाते. ही परंपरा पाहता मोपलवारांना उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती.

पदोन्नतीने आयएएस झालेले मोपलवार(Radheshyam Mopalwar) रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बनले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये एका कामाच्या मोबदल्यात भूखंडाची मागणी करत असल्याची मोपलवार यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. विरोधकांचा दबाव वाढल्याने काही काळासाठी त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. फडणवीस सरकारने क्लीन चिट दिल्यानंतर मोपलवार पुन्हा त्याच पदावर रुजू झाले.

समृद्धी महामार्गाचे एका टप्प्याचे काम दिलेल्या कंपनीशी त्यांच्या कन्येच्या कंपनीचे हितसंबंध असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे मोपलवार मुदतवाढ संपल्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात उतरणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar : घोटाळेबाज राधेश्याम मोपलवार अन् देवेंद्र फडणवीस यांचे नेमके 'कनेक्शन' काय?

प्रशासकीय अधिकारी म्हणून बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने मोपलवार यांनी बरीच मौजमजा केल्याचे आता समोर येत आहे. ही मौजमजा पुरेशी नव्हती की काय म्हणून त्यांना राजकारणाचा झगमगाटही खुणावत होता. मात्र त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मोपलवार हे आज ना उद्या आपल्या अंगलट येतील, याची कल्पना कदाचित महायुतीच्या नेत्यांना आली असावी.

आता रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मोपलवारांवरील आरोपांमुळे महायुतीची अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com