औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din)आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान ध्वजवंदन करण्यात आले. (Marathwada Mukti Sangram Din news update)
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री लगेच हैदराबादकडे रवाना झाले. त्यामुळे शिंदेंच्या याच छोटेखानी दौऱ्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनावरुनही आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 15 मिनिटांत हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आल्यामुळे सरकार आणि शिवसेनेमध्ये वाद पेटल्याची चिन्हे आहेत.
या कार्यक्रमाला अंबादास दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेकडूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आणि शिंदे गट या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
हैदराबादला गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हैदराबादला रवाना झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अमित शहा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. निजामांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका व्हावी, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या सर्वांना अभिवादन. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली मुक्तिसंग्रामाचा लढा लढला गेला होता. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला, मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोलं कुणीच करू शकत नाही,"
दानवे म्हणाले, "मराठवाडा मुक्तिसंग्रामाला मुख्ममंत्र्यांनी कमी वेळ दिला, त्यांना हैदराबादला जाण्याची घाई होती. ते दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत. राज्यातील एमआयडीसीतील भुखंडासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घ्यावी."
दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जातो. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ वाजण्याऐवजी सकाळी सात वाजताच कार्यक्रम घेतला, असे दानवे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.