Nanded Collector Office : सावकारी कर्जातून वाचवा... मुलांचा टाहो! किडनी विकणाऱ्या महिलेची पोलिसांकडून दखल

Lender Molestation Kidney to Sell : किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावर मोबाईल क्रमांकदेखील असल्याने या पोस्टरबाबत चर्चा सुरू झाली होती.
Nanded News
Nanded NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded : सावकारी कर्ज फेडण्यासाठी "किडनी विकणे आहे," अशी जाहिरात करणाऱ्या महिलेची पोलिसांनी दखल घेतली आहे. संबंधित महिलेची भेट घेऊन तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

सावकारी कर्ज फेडण्यासाठी "किडनी विकणे आहे," अशा आशयाचे फलक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकले आहेत. चक्क किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावर मोबाईल क्रमांकदेखील असल्याने या पोस्टरबाबत चर्चा सुरू झाली होती.

सत्यभामा चंचूलवाड या महिलेने हे पोस्टर लावले आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी उशिरा रात्री मूदखेड पोलिसांनी त्या महिलेचा जबाब नोंदवून घेतला आणि चौकशी सुरू केली.

Nanded News
Ulhasnagar News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर शिपायानेच केला जादूटोणा? गुन्हा दाखल, कारच्या चाकाखाली लिंबू...

पतीला जबर मारहाण...

मुदखेड तालुक्यातील वाई येथील सत्यभामा चंचूलवाड यांचे पती बालाजी चंचूलवाड यांना साप चावला होता. त्यांच्या उपचारासाठी सत्यभामा यांनी मुदखेड येथील अमोल चौंदते, भीमा चौंदते, राहुल चौंदते यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. नंतर त्यांना अनेक वेळा पैसे दिले. मात्र, व्याजाच्या पैशांसाठी चौंदते सावकारांनी त्यांच्या पतीला जबर मारहाण केली.

इच्छामरणाची परवानगी द्या...

सत्यभामा यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी सृष्टी यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना तीन जुलै 2021 रोजी पत्र लिहून तक्रार केली. कारवाई करा किंवा इच्छामरणाची परवानगी द्या, अशी त्यांनी मागणी केली होती. तेव्हा कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामूळे चंचूलवाड परिवाराने भीतीपोटी गाव सोडले.

मुला-मुलींना अश्रू अनावर

मागील अडीच वर्षांपासून हे कुटुंब मुंबईत होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 'किडनी विकणे आहे,' असे पोस्टर लावले होते. त्यावरून माध्यमांनी आणि पोलिसांनी या कुटुंबाशी संपर्क केला. त्यानंतर हे कुटुंब नांदेडला आले. आणि आम्हीच किडनी विकण्याची जाहिरात केली. राज्य सरकारकडे पत्राद्वारे तशी रीतसर मागणी या कुटुंबाने केली. कुटुंबावर आलेले प्रसंग सांगताना या मुला-मुलींना अश्रू अनावर झाले होते.

Nanded News
Navi Mumbai News : राष्ट्रवादी नेत्याच्या भावावर खंडणीचा गुन्हा; बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलची तोडफोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com