Devendra Fadanvis : राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे, त्यामुळे विकासकामाला गती आल्याचा दावा शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या ३८ हजार कोटींच्या विकासकामांचे भुमीपूनज आणि लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील याचा उल्लेख केला होता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तिजोरीच्या चाव्या म्हणजेच अर्थखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हाती आल्या आहेत. येत्या बुधवारी (ता.२५) फडणवीसांच्या उपस्थीतीत औरंगाबादेत राज्य वार्षिक नियोजन परिषदेची मराठवाडास्तरीय बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याला (Marathwada) या डबल इंजिन सरकारचे अर्थमंत्री पावणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे या भागातील विकास कामांना ब्रेक लागला आहे. मराठवाड्यातील अनुशेष हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. यावर विधानसभेत आणि बाहेर देखील नेहमीच चर्चा केली जाते. परंतु कोणतेच सरकार यावर गांभीर्याने विचार करत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता फडणवीस मराठवाड्याकडे लक्ष देतात का? वाढीव निधी देवून इथल्या विकासाला गती देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठवाडास्तरीय बैठक असल्याने सगळ्या जिल्ह्यांचे अधिकारी आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडून अधिकाधिक निधी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतून शहरात विविध कामे करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमात २८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने देखील केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.त्यानुसार महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
या प्रस्तावात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र इमारत उभारणे व पुराणवस्तू संग्रहालय इमारतीची देखभाल-दुरुस्ती व नूतनीकरण, शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक कमानी, महापालिका शाळेसाठी अत्याधुनिक अभ्यासिका, ५२ शाळांमध्ये सौर यंत्रणा यासह विविध कामांचा समावेश आहे. एकूण २८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.