Marathwada Political News : मराठवाड्यातील पालकमंत्र्यांनी लोकसभेचे मतदारसंघ सोडले वाऱ्यावर?

Loksabha Election and Marathwada Guardian Ministers : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील पालकमंत्री आपल्याच मतदारसंघात रमल्याचे दिसत आहेत.
Marathwada
MarathwadaSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, राज्यातील महायुती-महाविकास आघाडीचे जागावाटप काही जागांचा अपवाद वगळता पूर्ण झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, काही मतदारसंघांत पहिल्या टप्प्याचे मतदान होऊन दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. अशावेळी कुठल्याही मतदारसंघासाठी त्या त्या जिल्ह्याचा पालकमंत्री हा महत्त्वाचा मानला जातो.

परंतु मराठवाड्यात हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव लोकसभा मतदारसंघांचे पालकत्व पालकमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आहे, ते सध्या आपापल्या मतदारसंघात रमले आहेत. त्यामुळे पालकमंत्री असून ऐन लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील बीड, संभाजीनगर वगळता इतर मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Marathwada
Pankaja Munde News : 'जरांगेंवर टीका नाही, केली तर मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद'; पंकजांचा ललकार...

हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जालन्यात अतुल सावे, लातूर, नांदेडचे गिरीश महाजन, परभणीचे संजय बनसोडे, धाराशिवचे तानाजी सावंत सध्या लोकसभा निवडणुकीतून अंतर राखून असल्याचे चित्र आहे. पैकी गिरीश महाजन यांच्याकडे नांदेड, लातूर, धुळे या तीन जिल्ह्याचे पालकत्व आहे. पण सध्या महाजन हे आपल्या जळगाव जिल्ह्यात व्यस्त आहेत.

शिवसेनेचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार तर संभाजीनगर जिल्ह्यातही फारसे दिसत नाहीत, तर ज्या हिंगोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे तिकडेही ते फिरकत नाहीत. हिंगोली मतदारसंघाचा उमेदवार बदलून बाबूराव कदम कोहळीकर यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिली. एवढेच नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला ते स्वतः हजर राहिले.

Marathwada
Omraje Nimbalkar News : 'काळजी नसावी, आता मैदान आपलंच!'; ओमराजेंची धाराशिवमधून गर्जना

पंधरा दिवसांनी पुन्हा हिंगोलीत त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. पण सगळ्या धामधुमीत पालकमंत्री अब्दुल सत्तार मात्र कुठेच दिसले नाहीत. अशीच काहीसी परिस्थिती राज्याचे गृहनिर्माण तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची झाली आहे. संभाजीनगरपासून अवघ्या 60 किलोमीटर असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात अतुल सावे यांचे अजून पाय लागलेले नाहीत.

लातूर, नांदेडच्या बाबतीत गिरीश महाजन यांची अशीच उदासीनता दिसून आली आहे. परभणीत बनसोडे जागा रासपला सुटल्यापासून फक्त मोठ्या सभांना हजेरी लावण्याची औपचारिकता पार पाडताना दिसत आहेत. तानाजी सावंत धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे निश्चित झाले आहेत.

मराठवाड्यातील आठपैकी केवळ संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्ण क्षमतेने लोकसभेच्या उमेदवारासाठी झटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून स्वतः भुमरे हेच उमेदवार आहेत, तर बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण भाजप नेत्या आणि लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी झटताना दिसत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com