Omraje Nimbalkar News : 'काळजी नसावी, आता मैदान आपलंच!'; ओमराजेंची धाराशिवमधून गर्जना

Political News : ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जाची शनिवारी दुपारी छाननी पार पडली. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती.
MP Omprakash Rajenimbalkar
MP Omprakash Rajenimbalkar Sarkarnama

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहे. धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आली होती. ओमराजे यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. तसेच इतरही त्रुटी आढळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जाची शनिवारी दुपारी छाननी पार पडली. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती.

महाविकास आघाडीचे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Om Rajenimbalkar) यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी ओंबासे यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गुरुवारी त्यांनी अर्ज दाखल केला होता. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी ओंबासे यांनी नोंदवलेल्या आक्षेपांची पूर्तता करीत त्यासोबतच संपत्ती व इतर विवरण असलेले शपथ पत्र दाखल केले. त्यानंतर शनिवारी पार पडलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. यामुळे त्यांनी व त्यांच्या समर्थकानी निश्वास सोडला. ( Omraje Nimbalkar News )

MP Omprakash Rajenimbalkar
Satara Lok Sabha News: रामराजे- उदयनराजेंच्या भेटीने खळबळ, प्रभाकर घार्गेंच्या दालनात खलबतं

'मध्यंतरी मी भरलेल्या नामनिर्देशन पत्र (उमेदवारी फॉर्म) बाबत बातम्या बघून सर्व जणांना काळजी वाटत होती की नक्की काय होतंय. पण आत्ताच कळले की नामनिर्देशन अर्जात काहीही त्रुटी नाही आणि तो मंजूर करण्यात आला आहे. म्हणून लगेच तुम्हा सर्वांना सोशल मीडियाद्वारे हे कळवत आहे.

आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि शुभेच्छाने सर्व काही सुरळीत आहे. ही बातमी आल्यानंतर असंख्य जणांचे फोन आले, असंख्य लोकांनी काळजी दाखवली. असंख्य लोकांचे हे प्रेम, दाखवलेली काळजी हीच माझी कमावलेली पुंजी आहे पण आता एक सांगू इच्छितो फॉर्म संदर्भात काळजी नसावी. आता आपल्या हक्कासाठी लढायला तयार रहा. ही निवडणूक माझ्या खासदारकीची नव्हे तर सामान्य जनतेच्या हक्काची आहे मी फक्त तुमचा प्रतिनिधी म्हणून लढत आहे, अशी भावनिक पोस्ट ओम राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोंघाच्या अर्जात आढळल्या होत्या त्रुटी

दरम्यान, चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारीत अर्जात त्रुटी आढळल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे समोर आले होते. ओम राजेनिंबाळकर आणि अर्चना पाटील यांनी चार दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला होता. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

R

MP Omprakash Rajenimbalkar
Dharashiv Lok Sabha 2024 News : खासदार ओम राजेनिंबाळकरांनी दाखल केला पुन्हा उमेदवारी अर्ज; 'हे' आहे कारण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com