Thackeray Politics : संदीपान भुमरेंचा बंदोबस्त तर झाला, आता लक्ष अब्दुल सत्तारांकडे

Sandipan Bhumre and Abdul Sattar : उद्धव ठाकरेंनी भुमरेंविरोधात तगडा उमेदवार शोधला आहे आणि लोकसभेसोबत विधानसभेचीही तयारी सुरू केली आहे.
Abdul Sattar, Uddhav Thackeray, Sandipan Bhumre
Abdul Sattar, Uddhav Thackeray, Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar Political News :

बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात ज्याचा ज्याचा हातभार लागला, त्या प्रत्येकाला येत्या निवडणुकीत गाडा, असे आवाहन उद्धव ठाकरे 'शिवसंवाद' सभेतून करत आहेत. एवढेच नाही तर एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी 'मातोश्री'वरील बैठकीत पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेल्या दत्ता गोर्डे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

Abdul Sattar, Uddhav Thackeray, Sandipan Bhumre
Shivsena UBT News : पैठणमध्ये गोर्डे, वैजापुरात चिकटगांवकर ; ठाकरेंचा गद्दारांना कडक इशारा...

दत्ता गोर्डे कोण आहेत?

दत्ता गोर्डे हे संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढवली होती. ते भुमरेंना तगडे आव्हान ठरू शकतात. म्हणूनच लोकसभेनंतर (Loksabha Election) सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेची (Assembly Election) पूर्व तयारी म्हणून या प्रवेशाकडे पाहिले जाते.

पैठणमध्ये भुमरेंचा बंदोबस्त करण्यात यशस्वी झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अब्दुल सत्तार यांचा कसा बंदोबस्त करणार, याची उत्कंठा आता सगळ्यांना लागून राहिलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिल्लोडकडे दुर्लक्ष केल्यामुळे...

मुळात शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला येत गेल्यामुळे शिवसेनेने इथे कधी संघटनावाढीवर अधिक जोर दिलाच नाही. जे बोटावर मोजण्याइतके शिवसेनेचे स्थानिक नेते होते, तेही सत्तार यांच्या प्रभावाखालीच राजकारण करायचे. त्यामुळे पैठणमध्ये ताकद असल्याने ठाकरेंना तिथे भुमरेंच्या विरोधात पर्याय उभा करता आला. सिल्लोडमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही.

सत्तारांची ताकद

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे. अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात सत्तार यांचाच शब्द प्रमाण मानला जातो.

2019 मध्ये विधानसभेपूर्वी सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आधी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि नंतर थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत विरोध केला.

Abdul Sattar, Uddhav Thackeray, Sandipan Bhumre
MLA Ratnakar Gutte : परभणीतून लढण्याचा जानकरांचा निर्धार; गुट्टेंसाठी इकडे आड तिकडे विहीर

फडणवीसांचा सल्ला अन्...

शिवसेना-भाजपची युती असल्यामुळे फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावर मार्ग काढत सत्तारांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यासाठी हा मतदारसंघही सोडला. तेव्हा क्षणिक फायद्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांना शिवसेनेत घेतले आणि पुढे त्यांनीच ठाकरेंच्या खुर्चीला आणि पक्षाला सुरुंग लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

या गद्दारीचे उट्टे काढायचे असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांच्याविरोधात उमेदवार द्यावा लागेल.

2014 मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटली तेव्हा पहिल्यांदा शिवसेनेने सत्तार यांच्याविरोधात सुनील मिरकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले होते. त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये जाहीर सभाही घेतली होती. तेव्हा मिरकर यांनी 15 हजारांहून अधिक मते घेतली होती.

याचा फटका भाजपच्या सुरेश बनकर यांना बसला होता, तर सत्तारांना मिरकर यांच्या उमेदवारीने फायदाच झाला. आता 2024 मध्ये सत्तारांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाला आतापासूनच उमेदवार शोधावा लागेल. मतदारसंघात शिवसेनेची ताकद नसल्यामुळे ठाकरे गट ऐनवेळी कोणाला मैदानात उतरवणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Abdul Sattar, Uddhav Thackeray, Sandipan Bhumre
Dharashiv Loksabha 2024 : काका मला खासदार करा, पुतण्याची इच्छा तानाजी सावंत पूर्ण करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com