Shivsena UBT News : पैठणमध्ये गोर्डे, वैजापुरात चिकटगांवकर ; ठाकरेंचा गद्दारांना कडक इशारा...

Political News: आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे.
Datta gorde, bhausaheb chiktgaonkar
Datta gorde, bhausaheb chiktgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajinagr News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटली. राज्यातील 40 आमदारांनी बाळासाहेबांच्या विचारांसाठी म्हणत त्यांच्याच पक्षाचे दोन तुकडे केले. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे आणि पक्ष फुटल्यानंतरही एकनिष्ठ राहिलेल्या सामान्य शिवसैनिकांच्या बळावर आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवाद दौऱ्याला कोकणातून सुरुवात केली खरी, पण त्याचे हादरे इकडे मराठवाड्यातही बसायला लागले आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि सध्याच्या सरकारमध्ये रोजगार हमी मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्यासमोर ठाकरे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक भुमरेंच्याच राजकारणाला कंटाळून भाजप, राष्ट्रवादीमध्ये गेले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भुमरेंच्या विरुद्ध दंड थोपटत त्यांना घामही फोडला, त्या माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांना पुन्हा शिवबंधनात अडकवले. पैठणमध्ये भुमरे पिता-पुत्रांसाठी हा मोठा धक्का समजला जातो. ठाकरे यांनी ही खेळी करत भुमरेंचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याची पुरती तयारी तर केलीच, पण जिल्ह्यातील ज्या-ज्या आमदारांनी गद्दारी केली, त्या सगळ्यांनाच कडक इशारा दिला आहे.

Datta gorde, bhausaheb chiktgaonkar
Bulldozer Politics : यूपी पॅटर्न उद्योगनगरीत? आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा इशारा

पैठण मतदारसंघापूर्वी ठाकरेंनी वैजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगांवकर यांना पक्षात घेत शिंदेंसोबत गेलेल्या विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरणारे यांचा बंदोबस्त केला आहे. चिकटगांवकर यांचा वैजापूर मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून, आमदार म्हणून त्यांनी केलेली कामे आजही वैजापूरकरांच्या स्मरणात आहेत.

घरात वाद नको म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुतण्या अभय चिकटगांवकरसाठी हा मतदारसंघ सोडला होता. पण राष्ट्रवादीने केलेला हा बदल फसला आणि विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारणे अंगलट आले. यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आणि शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांच्या आशीर्वादाने उमेदवारी लाभलेल्या बोरणारे यांचे नशीब फळफळले. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेमतेम अडीच वर्षांतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत पायावर धोंडा पाडून घेतला. तेव्हापासून ठाकरे गट बोरणारेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या प्रयत्नात आहे. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासारखा तगडा नेता गळाला लागल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बोरनारे यांची वाट बिकट होणार आहे.

विशेष म्हणजे पैठणमध्ये दत्ता गोर्डे (Datta Gorde) आणि त्याआधी वैजापुरात भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना शिवबंधन बांधण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विशेष प्रयत्न केले होते. या दोन्ही खेळी यशस्वी ठरल्यानंतर ठाकरे गट आता शहरातील संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्या पश्चिम, प्रदीप जैस्वाल यांच्या मध्य आणि भाजपचे मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघात तगडा प्रतिस्पर्धी देण्याच्या तयारीत आहेत.

(Edited by Sachin Waghmare)

Datta gorde, bhausaheb chiktgaonkar
Shivsena UBT News : पैठणमध्ये ठाकरे गटाच्या खेळीने मंत्री संदीपान भुमरे होणार घायाळ...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com