Marathwada Teacher Constituency: जयदत्त क्षीरसागरांचं ठरलं कोणाला पाठिंबा द्यायचा

शिवसेनेतून निलंबित केलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
Marathwada Teacher Constituency |Jaydatta Kshirsagar
Marathwada Teacher Constituency |Jaydatta Kshirsagar
Published on
Updated on

Marathwada Teacher Constituency Election : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजप (BJP) उमेदवार किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण हा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील (Kiran Patil) यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी(दि.30) पाच शिक्षक मतदार संघातील निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेनेतून निलंबित केलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अखेरच्या क्षणी क्षीरसागरांनी भाजप उमेदवार किरण पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Marathwada Teacher Constituency |Jaydatta Kshirsagar
Meghalaya Assembly : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेला आमदार काँग्रेसकडून मैदानात ; काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

भाजप निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक, संस्था चालकांसोबत बैठक घेतली. त्यानंतरच क्षीरसागर यांनी किरण पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची भाजपबरोबरची जवळीकताही वाढत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीचा प्रचार थांबला. आता सोमवारी (ता.३०) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) विरुद्ध भाजपचे किरण पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपचे नवखे उमेदवार किरण पाटील तीन टर्म आमदार राहिलेल्या विक्रम काळेंना धक्का देतात? की मग काळेच बाजी मारतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

भाजपचे किरण पाटील हे नवखे असले तरी त्यांच्याकडेही संस्था चालवण्याचा अनुभव आहे. शिवाय भाजपची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे विक्रम काळे यांना तीन टर्मचा प्रदीर्घ अनुभव, प्रचार यंत्रणा राबवण्याचे कसब असल्याने या दोन उमेदवारांमध्ये चांगली लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com