Meghalaya Assembly : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेला आमदार काँग्रेसकडून मैदानात ; काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

Meghalaya Assembly Elections 2023 : सालेंग यांनी आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिली आहे.
Meghalaya Assembly Elections 2023
Meghalaya Assembly Elections 2023sarkarnama
Published on
Updated on

Meghalaya Assembly Elections 2023 : मेघालय येथे येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. तीन दिवसाच्या काँग्रेसने आपल्या उमेदवाराची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणुक समितिचे प्रभारी महासचिव मुकुल वासनिक यांनी या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दुसऱ्या यादीत काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शिलांगचे खासदार विंसेंट एच पाला सुतंगा सैपुंग हे आता विधानसभा निवडणूक लढविणार आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सालेंग ए संगमा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते गैम्बेग्रे (एसटी) विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरणार आहेत. सालेंग यांनी आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिली आहे.

माजी पोलिस अधिकारी चैंपियन आर संगमा हे सोंगसाक विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अनेक माजी मंत्री, आमदारांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. तसेच आठ महिलांना काँग्रेसने संधी दिली आहे.

Meghalaya Assembly Elections 2023
Sharad Pawar News : 'पहाटेच्या शपथविधी'वर शरद पवारांनी मौन सोडलं ; म्हणाले..

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. पण त्यानंतर सर्व आमदारांनी तृणमूल काँग्रेस आणि सत्ताधारी नॅशनल पिपल्स पार्टीसह अन्य पक्षात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (2010-2018)यांच्या नेतृत्वाखाली १२ आमदारांनी २०१८ मध्ये मोठे यश मिळवले होते. त्यांनी २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

तर दुसरीकडे त्रिपुरा विधानसभेची (Tripura Polls 2023 )निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपने (bjp) विरोधकांना झटका देण्यास सुरवात केली आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी गळाला लावण्यास सुरवात केली आहे. लवकरच हे नेते दिल्ली येथील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Meghalaya Assembly Elections 2023
Santosh Bangar News : व्हिडिओ व्हायरल झालेल्या 'त्या' प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते बिलाल मिया यांच्यासह काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. माकपाचे आमदार मोबोशर अली आणि तृणमूल कॉंग्रेस नेता सुबल भौमिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुबल भौमिक यांना काही महिन्यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले होते.त्यांनी जुलै २०२१ मध्ये तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

२०१८च्या निवडणुकीत माकपाचे आमदार मोबोशर अली हे कैलासहर विधानसभा मतदार संघातून निवडुन आले आहेत. तर बिलाल मिया हे १९८८ आणि १९९८ मध्ये दोन वेळा बॉक्सानगर विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले आहेत. दोन्ही नेते आपल्या पक्षातील अल्पसंख्याक समाजातील ज्येष्ठ नेते आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com