Marathwada News : मराठवाड्यात हक्काच्या 8.6 टीएमसी पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. (Marathwada Water Issue) उच्च न्यायालयानंतर, सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली नाही, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या दबाला बळी पडून सरकार पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाहीये. या विरोधात आज मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कार्यालयावर शाईफेक करत संताप व्यक्त केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. तीन दिवसांपुर्वी (Marathwada) मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे रमेश गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी (Water Relase) तर सोडाच, पण ५० टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही तात्काळ घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा दिला होता.
त्यानूसार आज मराठवाडा बहुजन विकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयावर दुपारी धडक दिली. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. (Maharashtra) यावेळी काही आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शाईफेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी झटापटही झाली, पण आंदोलकांनी सोबत आणलेल्या डब्यातील शाई प्रवेशद्वारावर फेकत निषेध व्यक्त केला. जायकवाडी धरणातील पाण्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गोदावरी नदीतील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळत नाही.
या नदीमध्ये ८१ टीएमसी पाणी मराठवाडा, ११५ टीएमसी पाणी नाशिक-नगरला देण्याचे सूत्र असताना नगर-नाशिकने मराठवाड्याच्या हक्काच्या ५० टीएमसी पाण्यावर १६५ टीएमसीची धरणे बांधली आहेत. मराठवाड्यात ४० लाख हेक्टर शेती कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतीमुळे ६ ऑक्टोबर १९७५ पासून आजपर्यंत सुमारे ६०,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
लाखो लोकांनी उदरनिर्वाहासाठी मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, मध्य प्रदेश, तेलंगणा येथे स्थलांतर केले आहे. मराठवाड्याच्या पाण्यावर बांधलेले ५० टीएमसीचे धरण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व राजकीय नेत्यांच्या दबावाखाली बांधले गेले असल्याचा आरोप मराठवाडा बहुजन विकास आघाडीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला होता.
दरम्यान, काल झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही, अखेर पाण्यासाठी मराठावाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयावर शाईफेक करत आंदोलकांनी उग्र आंदोलन केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.