
Sambhajinagar News : उर्ध्व भागातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे, यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांनी एकजूट दाखवत केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. (Marathwada Water News) रास्ता रोको, धरणे आंदोलन, जेलभरो आणि मराठवाडा बंदचा इशारा देताच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध मावळला. शासनानेही परिस्थितीचे गांभीर्य, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती न दिल्याने निर्णय घेतला.
अखेर जायकवाडी धरणात जलओघ सुरू झाला असून, 8.6 टीएमसी एवढे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत यायला सुरुवात झाली आहे. (Water Relase) मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी कधी नव्हे ती भाजप वगळता सर्व पक्षांची एकजूट दिसली. विशेषतः महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरलेले दिसले.
आज जायकवाडी धरणात दाखल झालेल्या पाण्याचे जलपूजनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे केले. (Marathwada) मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी केलेल्या जनआंदोलनामुळे शासनाने जायकवाडी धरणामध्ये उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडल्याने आज पैठण येथे जलपूजन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला 8.6 टीएमसी पाण्याच्या माध्यमातून किमान रब्बीला तीन ते चार व उन्हाळ्यात एक आवर्तन देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जलपूजनासाठी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार संजय वाघचौरे, अनिल पटेल, डाॅ. कल्याण काळे आणि या जलआंदोलनात केंद्रस्थानी राहिलेले माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
हक्काच्या पाण्यासाठी केलेले जनआंदोलन यशस्वी झाल्याबद्दल राजेश टोपे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. जायकवाडी धरणामध्ये उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याबाबत मराठवाड्याच्या पाण्याच्या हक्काच्या लढ्यात पक्षविरहीत सर्व लोकप्रतिनिधी, माजी आमदार, पाणी वापर सहकारी संस्था, मसिहा, पाणी परिषद, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झाले होते.
शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.