Sharad Pawar News : शरद पवारांनी विरोधकांच्या अजून एका मुद्दाची हवा काढली ; मोदींची डिग्री हा...

Sharad Pawar On PM Modi Degree Certificate Issue : "हा राजकीय मुद्दा आहे का?'
Sharad Pawar, pm modi
Sharad Pawar, pm modiSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar On PM Modi Degree Certificate Issue : गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या मुद्यांवरुन मोदी विरोधकांनी रान उठवलं आहे. मोदींच्या पदवीबाबत शंका उपस्थित करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर भाष्य केलं. ते नाशिक येथे काल (रविवारी) माध्यमांशी बोलत होते. उद्योगपती गौतम अडानी यांच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेविरोधात पवारांनी भूमिका घेतल्याचा मुद्दा ताजा असताना पवारांनी विरोधकांच्या अजून एका मुद्याची हवा काढून काढली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीसंदर्भात केलेल्या मागणीवरुन गुजरात हायकोर्टाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

Sharad Pawar, pm modi
BJP News : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; अकाली दल, अन्नाद्रमुकचे नेते भाजपमध्ये...

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उघडपणे या डिग्रीच्या वादाऐवजी लोकांशी निगडीत प्रश्नांवरुन प्रश्न उपस्थित करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शरद पवारांनी मोदींच्या पदवीबाबतच्या वादावर आपल मत व्यक्त केलं आहे.

नाशिक येथे पवारांना मोदींच्या पदवीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना "हा राजकीय मुद्दा आहे का?' असा प्रश्न विचारला. शरद पवार म्हणाले,

Sharad Pawar, pm modi
Rajasthan Congress News : आपल्याच सरकारच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्र्याचं धरणे आंदोलन ; CM गेहलोत यांच्यावर हल्लाबोल

"आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत, तुमची पदवी काय आहे, माझी पदवी काय आहे?, हा राजकीय मु्द्दा आहे का?" "बेरोजगारी, कायदा सुवस्था, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे. आज धर्म आणि जातीच्या नावावर जनतेमध्ये तणाव पसरविला जात आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यावर चर्चा करायला हवी," असे पवार म्हणाले.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com