
Mumbai News : बीड संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात 'मकोका' लावलेला आरोपी वाल्मिक कराड याची कोठडी घेण्यासाठी 'एसआयटी' पथकाने त्याला बीड जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. 'एसआयटी'ने त्याची कोठडी मागताना न्यायालयासमोर मोठा दावा केला.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी वाल्मिक कराड हा सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांच्या संपर्कात होता. त्याने देशमुखांना धमकी दिली. त्यातूनच 'मकोका' लावल्याचा दावा 'एसआयटी'ने न्यायालयात केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
'एसआयटी'ने खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याला काल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कट वर्ग करून घेतले. या गुन्ह्यात त्याला बीड (BEED) जिल्हा न्यायालयासमोर हजर करत दहा दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यासाठी 'एसआयटी'ने संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर या हत्येच्या दिवशी दुपारी 3.20 ते 3.20 या दरम्यान वाल्मिक कराड हा आरोपी सुदर्शन चाटे आणि विष्णू घुले यांच्यात मोबाईलवरून संवाद झाल्याचा दावा केला. हा संवाद नेमका काय होता, याचा तपास करायचा आहे, यासाठी कोठडी हवी, असा युक्तिवाद 'एसआयटी'ने न्यायालयासमोर केला.
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची, हत्येची वेळेशी वाल्मिक कराड, घुले आणि चाटे यांच्या संवादाची वेळ मिळतीजुळती आहे. त्यामुळे यांच्यात नेमका काय संवाद होता, याचा उलगडा होणे गरजेचा आहे. हत्येच्या (Crime) दिवशी हजारो काॅल तपासण्यात आले आहेत. त्यात सहा ते सात काॅल मिळते-जुळते आढळले आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याला समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे, त्यामुळे कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद 'एसआयटी'ने न्यायालयासमोर केला आहे.
वाल्मिक कराड याला 'मकोका' का लावला? याची माहिती देताना अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर गुन्ह्याची यादी दिली. 'मकोका' गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, त्याचा शोध घ्यायचा आहे. वाल्मिक कराड याची देशात, तसेच परदेशात मालमत्ता आहे का? याचा शोध घ्यायचा आहे, तसे तांत्रिक पुरावे असून, त्याची जुळवाजुळव करायची आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वकिलांनी केला.
आरोपीच्या वकिलांनी वाल्मिक कराड याची अटक बेकायदेशीर आहे. तसेच त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. अटकेत असलेल्या इतर आरोपींनी त्याचे नाव देखील गुन्ह्यात घेतलेले नाही. एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे, आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? याचे पुरावे देखील नाहीत, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराड याचा पोलिस कोठडीत मुक्काम राहणार आहे.
केवळ दोन फोन केला म्हणून वाल्मिक कराड याला आरोपी केलं का? हत्येच्या गुन्ह्यात कराड याच्या सहभागाची खात्री केली होती का? असे प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.