Maharashtra Congress President : नाना पटोलेंचे पायउतार होण्याचे संकेत? चव्हाण, थोरात, कदम, ठाकूर, देशमुख चर्चेत...

Maharashtra Congress Party Leadership Change : काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
Congress Leaders
Congress LeadersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सुधारणा करत देशपातळीवर सुधारणा केली. लोकसभेत महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीत काँग्रेसनं चांगलं कमबॅग केले. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीसमोर महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा धुव्वां उडाला.

या पराभवाच्या धक्क्यानं काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमधील दिग्गजांना देखील पराभवाला समोरं जावं लागलं. यातून सावरण्यासाठी काँग्रेसने धडपड सुरू केली असून प्रदेश पातळीवर संघटनात्मक बदलाची तयारी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले पायउतार होत असून, आता पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, अमित देशमुख यांची नावं चर्चेत आहेत.

भाजप (BJP) प्रदेशाध्यपदाच्या बदलानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद बदल होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्षाकडून संधी मिळणार का?, अशी चर्चा आहे.

आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख या तरुण चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नावे देखील या पदासाठी चर्चेत आहेत.

Congress Leaders
Rajnath Singh : 'आयएनएस सूरत', 'आयएनएस निलगिरी' म्हणजे 'स्वदेशी' ताकद; मंत्री राजनाथ सिंह यांचा देशविघातक शक्तींना इशारा

नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आता चार वर्षे झाली आहेत. विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. तसं काँग्रेसमधील त्यांचा विरोध देखील आक्रमक झाले होते. यानंतर राहुल गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवले होते. परंतु राहुल गांधींकडून त्यांना अभय मिळाला.

Congress Leaders
Top Ten News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण; मोदी म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज'

वरिष्ठांच्या नावाची चर्चा

काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये निउत्साहाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी काँग्रेस नेतृत्व तरुण चेहऱ्याच्या शोधात आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांची चर्चा असतानाच, आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार, आणि यासाठी नेमकं काय राजकारण होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ठाकूर यांचं नाव चर्चेत

विदर्भातून यशोमती ठाकूर यांचं देखील नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात आधिक जागा जिंकल्या आहेत. लोकसभेत काँग्रेसला विदर्भामध्ये चांगलं यश मिळालं. विदर्भातून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव विधिमंडळ गटनेतेपदासाठी चर्चेत आहे. पटोले किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी कोणालाही विधिमंडळ गटनेते बनवले तर प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जावू शकतं, असं देखील सांगितलं जात आहे.

पटोले यांचा या नेत्यांसाठी 'फिल्डिंग'

अमित देशमुख यांना प्रदेशाध्यपद देण्यासाठी नाना पटोले आग्रही आहेत. सतेज पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जुलैमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. यासाठी देखील सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वजीत कदम यांचे नाव देखील चर्चेत आहे. पक्षातील तरुण नेते स्वतःहून हे पद घेण्यास इच्छुक नाहीत, असंही म्हटलं जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे देखील नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. परंतु त्यावर चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. चव्हाण यांनी या होणाऱ्या नावांच्या चर्चेबाबत बोलताना म्हटलं,होणाऱ्या चर्चांवर माझं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी नाही. या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की, नाही हे मला माहीत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com