औरंगाबाद ः ओम्रीकोन संदर्भात थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ काॅन्फरसिंग बैठकीला सुरूवात झाली आहे. ओमीक्रोन,लसीकरनाबाबत या बैठकीत चर्चा होणार असून जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थीत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दक्षिन आफ्रिकेतून होणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केंद्राकडे केली असून यावर केंद्र निश्चित विचार करेल, अशी अपेक्षाही टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.
प्रत्येकाने मास्क घालावा, असे आवाहन करतांना त्यांनी मास्क घातलेला नव्हता. याकडे लक्ष वेधले तेव्हा बोलतांना शब्द स्पष्ट ऐकू यावेत यासाठी मास्क घातला नव्हता. पण माझी चूक झाली हे मान्य करतो, पुढे दक्षता घेईल असेही, टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोना आटोक्यात आला असे वाटत असतांनाच आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या विषाणूला ओमीक्रॉन असे संबोधले आहे. दुसऱ्या लाटेतील डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच केंद्र सरकारने राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ओमीक्रॉन हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा नवा विषाणू राज्यात येऊ नये यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची महत्वाची बैठक व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे बोलावली आहे. टोपे हे स्वतः देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.