Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर आज यश आले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकलेल्या मराठ्यांच्या वादळाचा धसका राज्य सरकारने अखेर घेतला. मनोज जरांगे-पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अध्यादेशाची प्रत वाशीत धडकलेल्या लाखो मराठाबांधवांच्या साक्षीने जरांगे-पाटील यांच्या हाती दिली. (MP Imtiaz Jalil's emotional tweet On Manoj Jarange Patil Maratha Reservation Morcha )
मराठ्यांच्या एकजूटीचा आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यासारख्या सामान्य राजकारणविरहित व्यक्तीने प्रामाणिकपणे दिलेल्या लढ्याचे हे यश असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनीही या यशाबद्दल समस्त मराठा समाजाचे अभिनंदन करीत मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाला आपला सलाम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाजमाध्यमावर इम्तियाज यांनी यासंदर्भात पोस्ट टाकत राजकारण्यांवरही निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा आणि बांधिलकी एका छोट्या गावातल्या सामान्य माणसालाही किती आदर देऊ शकते, याचे जरांगे-पाटील हे उत्तम उदाहरण आहे. कदाचित सध्याच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला एवढा मोठा अनुयायी नसावा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जरांगे-पाटील आहेत. ते ज्या कारणासाठी लढा देत होते, त्या कारणाशी प्रामाणिक होते. त्यांच्या आंदोलनाचा अंतिम परिणाम काहीही असो, पण त्यांच्या आंदोलनाने एक मजबूत संदेश दिला आहे.
लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडू लागला आहे आणि ते एका रात्रीत सामान्य माणसाला आपला नायक बनवू शकतात, हे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने आणि जरांगे-पाटील यांना या समाजबाधवांनी दिलेल्या पाठिंब्याने दाखवून दिले आहे. या सामान्य माणसाला माझा सलाम, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी आपले मत व्यक्त केले. मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीतून सुरू केलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्यानंतर या आंदोलनाची धग राज्यभरात पोहोचली होती.
इम्तियाज जलील यांनी अंतरवालीत जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम समाज या लढ्यात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास दिला होता. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाचा पहिला लढा जिंकल्यावर त्यांनी जरांगे-पाटील यांना सर्वसामान्य जनतेकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचे कौतुक करताना त्यांच्या प्रामाणिकपणालाही सलाम केला.
(Edited By-Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.