Maratha Reservation Manoj Jarange Patil News :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेला लढा यशस्वी ठरला आहे. आंदोलन यशस्वी झाल्याने मराठा समाजात आनंद आहे. अनेक ठिकाणी जल्लोषही करण्यात येत आहे. नवी मुंबईत वाशीमध्ये आंदोलनाला यश आल्यानंतर मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे यांच्यासह मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या जल्लोषाच्या घोषणा दिल्या गेला. दुसरीकडे जरांगे-पाटील यांच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे.
संपूर्ण मराठा समाज आनंदात आहे. तसेच जरांगेंचे कुटुंबीयही आनंदित झाले आहेत. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर जरांगे यांच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. साडेपाच महिन्यांनंतर पप्पांची भेट होणार असल्याने जरांगे यांचा मुलगा शिवराज हा आनंदात आहे. पप्पा भेटल्यानंतर त्यांना खास गिफ्ट देणार असल्याचे तो म्हणाला.
शिवराजने काय म्हटले?
मराठा आरक्षणाच्या यशावर शिवराजने प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी आजचा दिवस सणासारखा आहे. पप्पांनी (Manoj Jarange-Patil) समाजासाठी काम केले. त्यांचे आंदोलन सार्थक झाले. आज मला खूप आनंद झाला आहे. पप्पांची भेट झाल्यावर मी त्यांना खास गिफ्ट देणार आहे. माझे गिफ्ट हे सस्पेन्स आहे, असे शिवराज म्हणाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पप्पा घरी आल्यावर मी त्यांना गिफ्ट देणार आहे. साडेपाच महिन्यांनंतर पप्पा घरी येणार आहेत. यामुळे आम्हाला खूप आनंद आहे, असे शिवराज म्हणाला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही, अशी प्रतिज्ञा मनोज जरांगे-पाटील यांनी केली होती. जरांगे पाटील यांची ही प्रतिज्ञा आता पूर्ण झाली आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.