Abdul Sattar On Reservation : 'जरांगे पाटील,भुजबळसाहब का होने दो...'; मुस्लिम आरक्षणावर सत्तारांचा सबुरीचा सल्ला

Maratha Vs Obc Reservation : अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात हा विषय अत्यंत सहज मुस्लिम समाजाला सबुरीचा सल्ला दिला.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. कुठल्याही गंभीर विषायवरही अगदी सहजपणे मत व्यक्त करत तो हलक्या फुलक्या पद्धतीने ते मांडतात. कधीकधी विषयाचे गांभीर्य घालवण्यामुळे त्यांच्यावर नामुष्कीही ओढावल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या राज्यात मराठा व ओबीसी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाज व नोंदी आढळलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना ओबीसीमधून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. राज्य सरकारनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा एकाचवेळी मराठा आणि सरकारशी संघर्ष सुरू आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस लोकार्पण सोहळ्यात मुस्लिम आरक्षणाचा विषय निघाला.

Abdul Sattar
Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांची इस्लामपुरात एन्ट्री, पण जयंत पाटलांबाबत चुप्पी!

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या भाषणात हा विषय अत्यंत सहजरित्या घेत मुस्लिम समाजाला सबुरीचा सल्ला दिला. सब्र करो, हमारा भी नंबर लगेगा. पहेले जरांगे पाटील और भुजबळसाहब का होने दो, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तार यांच्या हज हाऊसच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अजूनही होत आहे.

सत्तार यांनी या कार्यक्रमात मनसोक्त टोलेबाजी करत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना चिमटे काढले. मराठा, ओबीसी वादावरही त्यांनी कुणालाही न दुखावता भाष्य केले. मुस्लिम आरक्षण आपल्यालाही मिळेल, पण थोडा धीर धरा. सब का सब्र से होते है. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मुद्याला विरोध करत ओबीसींचे एल्गार मेळावे घेत हल्ला चढवणारे राज्यातील राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोज हे दोघे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि इशारे देत आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणाचा विषय निघताच सावध भूमिका घेतली. आधी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचे होऊ द्या, त्यांच्या भांडणात आपला नंबर लागणार नाही. आपल्यालाही आरक्षण मिळेल, पण थोडा धीर धरा. शेवटी कोणतेही काम हे सबुरीनेच होत असते, असे म्हणत त्यांनी मोठ्या खुबीने मुस्लिम आरक्षणाचा येत्या निवडणुकीत अचडणीचा ठरू शकणारा मुद्दा टोलावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Abdul Sattar
Lok Sabha Election 2024 : एकट्या भाजपला निवडणुकीत किती जागा मिळणार? मोदींनी लोकसभेतच सांगितला आकडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com