औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीबद्दल (Shiv Sena-bjp alliance) विधान केले. ते म्हणाले, भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच (Nitin Gadkari) शिवसेना-भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. शिवाय आपल्या याआधी केलेल्या विधानावरही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.
सत्तार म्हणाले, मी कालही हे विधान केले होते आणि आजही करतोय, सेना-भाजपमधील युतीसाठीचे प्रयत्न गडकरीच करू शकतील. कारण गडकरी हा माणूस मागील ३० वर्षांपासून मातोश्रीवर जात आहेत. तसेच, दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात व दोन व्यक्तींची मनही जुळवूही शकतात, असे स्पष्ट मत सत्तारांनी मांडले आहे. सत्तार हे भाजप-शिवसेना युतीसाठी आग्रही असून याबाबत त्यांनी याआधीही उच्चार केला होता.
सत्तारांनी यापूर्वी दिल्ली दौऱ्यावर असताना, सेना-भाजप युतीवर बोलतांना म्हणाले होते की, गडकरींनी पुढाकार घेतल्यास युतीचा पूल बांधला जाऊ शकतो. उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी असून महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर गडकरी हे राज्याचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे युतीचा पूल जोडायचे त्यांनी मनावर घेतले तर ते ठाकरे यांच्याकडे जातील. त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप-सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात", असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील सत्तार यांना सबुरीचा सल्ला देत त्यांचे कान टोचले होते. तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खिल्ली उडवली होती आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी सत्ताराच्या वक्तव्याला मीच काय पण कुणीच गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला होता.
दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत राहणारे सत्तार हे असे वक्तव्य करून काय साध्य करून बघताहेत यावर राजकीय वर्तूळात चर्चा रंगत आहेत. काही दिवसापुर्वी औरंगाबाद दुध संघाच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीचा विजय झाला असून यावेळी भाजप नेत्यांशी त्यांचे चागंलेच जुळलेले बघायला मिळाले. मात्र, स्वपक्षातील जेष्ठ नेत्यांनी सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला असतांनाही सातत्याने सत्तार असे वक्तव्य करत असल्याने राजकीय चर्चा मात्र जोरात रंगत आहेत. आता सत्ताराने पुन्हा केलेल्या वक्तव्यावर भाजप-सेनेच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.