रस्ते कामातील भ्रष्टाचाराचे फेसबुक लाईव्ह सुरू असतांनाच मंत्री भुमरेंच्या भावाकडून हल्ला

मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याच तालुक्यातील रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा पंचनामा फेसबुक लाईव्हवर सुरू होता.
Ranjeet Narvade-Badrinarayan Bhumre
Ranjeet Narvade-Badrinarayan BhumreSarkarnama

औरंगाबाद : रस्त्याच्या कामात गैरव्यवहार करत बीले उचलल्याचा आरोप करत भाजपच्या जिल्हा व तालुका उपाध्यक्षाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला. या रागातून रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांचे बंधु राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी रणजीत नरवडे आणि भाजपचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे (Badrinarayan Bhumare) यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे रणजीत नवरवडे हा संदीपान भुमरे यांचाच सख्खा भाचा असल्याचे समजते. नरवडे यांच्या पाठीवर वळ उमटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली असून या प्रकाराने पैठण तालुक्यात एकच खबळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गापासून ते साजेगाव- लिंबगाव रस्त्याच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप करत भाजपचे तालुका उपाध्यक्ष नरवडे आणि जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत होते.

याची माहिती मिळताच राजू भुमरे यांच्यासह काहीजण लाठ्या-काठ्या घेऊन तिथे आले. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर अचानक शिवीगाळ करत त्यांनी नरवडे व बद्रीनारायण भुमरे यांच्यावर हल्ला केला. साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवडे यांनी आरोप केला होता.

मारहाणीनंतर रणजीत नरवडे आणि बद्रीनारायण भुमरे हे तक्रार देण्यासाठी पाचोड पोलिस ठाण्यात पोहचले, पण तिथे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या दोघांनी औरंगाबाद येथे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणी हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैठण तालुक्यात विविध योजनेतर्गत रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. परंतु कामे न करताच कोट्यावधींची बोगस बीले उचलली जात असल्याची तक्रार भाजपचे बद्रीनारायण भुमरे आणि इतरांनी विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आठवडाभरापुर्वीच केली होती.

Ranjeet Narvade-Badrinarayan Bhumre
शिवसेना आमदाराकडून मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण

त्यानंतर संबधीतांनी चौकशीचे आदेश दिले होते. संबंधीत ठेकेदारांनी काम न करताच बोगस बिले उचलल्यामुळे प्रकरण गळ्याशी येत असल्याचे लक्षात येताच कामाला रात्रीतून सुरूवात केली. याची माहिती तक्रारदार बद्रीनारायण भुमरे यांना कळताच आज दुपारी ते साजेगाव -लिंबगाव रस्त्यावर पोहचले व सुरु असलेल्या कामाचे त्यांनी थेट फेसबुक सुरू केले.

याची कुणकुण संदीपान भुमरे यांचे बंधु राजु भुमरे, पुतण्या शिवराज भुमरे (( सरपंच) हे आपल्या समर्थकांसह घटनास्थळी दाखल झाले. `आम्ही कोणाच्या बापाचे पैसे खाल्ले नाही, तुम्ही तक्रार कशाला करता`, म्हणत शिवीगाळ करू लागले.

तेव्हाच संदीपान भुमरे यांचे भाचे असलेले रणजित नरवडे व रणवीर नरवडे यांनी `तुम्ही बोगस बिलं काढले नाही, तर मग तक्रारीनंतर काम कसे सुरू केले, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा संतापलेल्या राजू भुमरे यांनी या दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. तर दुसरीकडे बद्रीनारायण भुमरे यांनाही आठ ते दहा जणांनी घेराव घालून लाथाबुक्यांनी तुडवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com