शिवसेना आमदाराकडून मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण

घरातील शुभ कार्याला थोरामोठांचे आशिर्वाद लाभावेत या भावनेतून आपण पहिली लग्नपत्रिका बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केली. (Mla udaysingh rajput)
Mla Udaysingh Rajput
Mla Udaysingh RajputSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक व सर्वसामान्यांची संख्या काही कमी नाही. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब जीव की प्राण होते. त्यामुळे त्यांनी दिलेली हिंदुत्वाची शिकवण आणि ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण शिवसैनिक आत्मसात करून आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान शिवसैनिकांच्या मनात किती अढळ आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

कन्नड-सोयगांव मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपुत यांचा एकुलता एक मुलगा करण याचा विवाह येत्या २९ डिसेंबर रोजी नाशिक येथे पार पडणार आहे. या लग्नाच्या निमंमत्रण पत्रिका वाटण्याचे काम राजपूत यांनी हाती घेतले आहे. नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ठ यांना पत्रिका देण्यापुर्वी आमदार राजूपत हे आपल्या मुलासह आज थेट मुंबईत मातोश्रीवर पोहचले.

तिथे त्यांनी शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनासमोर नतमस्तक होत पहिली लग्नपत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निंमत्रण पत्रिका देण्यापुर्वी राजपुत पिता पुत्र शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून मातोश्रीवर गेले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर आणि नितांत प्रेम यामुळेच घरातील शुभ कार्याला थोरामोठांचे आशिर्वाद लाभावेत या भावनेतून आपण पहिली लग्नपत्रिका बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केली. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब नेहमीच कुटुंबप्रमुख राहिले आहेत. त्यांचे आमच्या ह्दयतील स्थान अढळ आहे.

त्यामुळे कुठल्याही सुख-दुःखाच्या प्रसंगी आपण जशी आपल्या पुर्वजांची आठवण काढतो, त्यांचे आशिर्वाद मागतो, तीच भावना माझी बाळासाहेबांबद्दलची आहे. म्हणूनच मी स्वःत मुलाला घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. बाळासाहेबांच्या आसनाचे दर्शन घेऊन त्यांना पहिली पत्रिका अर्पण केली. शिवाजी पार्कच्या स्मारकावर जाऊन तिथेही पत्रिका अर्पण करून दर्शन घेतले.

Mla Udaysingh Rajput
नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मुलाचे लग्न २९ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे होणार आहे. तत्पुर्वी माझ्या मुळगावी म्हणजे नागदला २५ डिसेंबरला गाव पंगत देवून त्यांचेही आशिर्वाद नवदांमप्त्याला मिळावेत, अशी प्रार्थना करणार असल्याचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com