MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?

MLA Babajani Durrani term given by Sharad Pawar has expired : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये झालेले बंड याचा फटका बाबाजानी दुर्राणी यांनाही बसला.
MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल जाते ते विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अब्दुल्ला बाबाजीनी खान दुर्राणी यांचा कार्यकाळ आज संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असतांना शरद पवार यांनी दुर्राणी यांना दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली होती. जुलै 2018 मध्ये बाबाजानी दुर्राणी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती.

शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले तेव्हा दुर्राणी यांनी कायम मोठ्या साहेबांची म्हणजे शरद पवारांची साथ दिली. अजित पवार यांच्यासाठी दुर्राणी यांचे फारसे सख्य कधीच नव्हते. पण राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये झालेले बंड याचा फटका बाबाजानी दुर्राणी यांनाही बसला.

पाथरी नगर परिषद आणि जिल्ह्यातील त्यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याचे प्रयत्न, निधी, विकासाची कामे रोखत होत असलेली कोंडी फोडण्यासाठी दुर्राणी यांनी एक मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजित पवार (AJit Pawar) आणि शरद पवार असे दोन स्वतंत्र पक्ष झाले तेव्हा मराठवाड्यातून कोण कोणाच्या बाजूने किंवा सोबत जातो याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

राष्ट्रवादीत असतांना ज्या अजित पवार यांच्याशी कधीच पटले नाही, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय बाबाजानी दुर्राणी यांना घ्यावा लागला. अजित पवारांसोबत गेल्यानंतर पाथरी आणि जिल्ह्याच्या राजकारणात दुर्राणी यांना पक्षांतर्गत होणारा त्रास काहीसा कमी झाला. पण दुर्राणी यांना शरद पवारांची साथ सोडल्याची खंत कायम होती.

MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?
Marathwada Congress Politics News : मराठवाड्यात तीन खासदार निवडून आल्याने काँग्रेसमध्ये जान आली..

मोठ्या साहेबांच्या कृपनेने मिळालेल्या विधान परिषदेचा दुर्राणी यांचा कार्यकाळ आज संपत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा कार्यकाळ संपेल. 2004 ते 2009 दरम्यान ते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. शिवसेनेचे तीन टर्म आमदार राहिलेल्या हरिभाऊ लहाने यांचा दुर्राणी यांनी पराभव केला होता.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते. पाथरी विधानसभा मतदासंघावर मजबूत पकड असलेले दुर्राणी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा विश्वासू अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पाथरी नगर परिषदेतून नगरसेवक पदापासून दुर्राणी यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती.

MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?
Abdul Sattar News : काँग्रेसचा विरोध डावलून सत्तारांनी केले अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन..

नंतर नगर परिषदेचे अध्यक्ष, वक्फ बोर्डाचे सदस्य होते. 10 जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती. आज ते या पदावरून निवृत्त होत आहे. यापुढे काय? असा प्रश्न सहाजिकच दुर्राणी आणि त्यांच्या समर्थकांना पडणार आहे. शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर अजित पवार दुर्राणी यांचे राजकीय पुनर्वसन करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com