MLA Bacchu Kadu On BJP : भाजपची मिठी अफझलखानासारखी..

Hingoli News : आमच्यासोबत दगा फटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो.
Bacchu Kadu News
Bacchu Kadu NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : भाजपची मिठी ही अफझलखानासारखी आहे, ते मित्र म्हणून जवळ घेतात आणि नंतर अफझलखानासारखा वार करतात, असा घरचा आहेर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपला दिला. (Hingoli News) आमदार बच्चू कडू यांना आवरा, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले होते.

Bacchu Kadu News
Sanjay Shirsat on cabinet expansion : गोगावलेंनी आशा सोडली, शिरसाटांना अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा...

एकीकडे सत्तेत सहभागी करून घ्यायचे आणि दुसरीकडे खच्चीकरण करायचे हे योग्य नाही. ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक असले पाहिजे, असा सल्लाही (Bachuu Kadu) बच्चू कडू यांनी भाजपला दिला. (BJP) आमच्यासोबत दगा फटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, असा उपदेशही कडू यांनी केला.

हिंगोली दौऱ्यावर असलेले बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. (Hingoli) हेमंत पाटील यांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याच्या कृतीचे बच्चू कडू यांनी समर्थन केले. आपण घर जसे चांगले ठेवतो तसेच रुग्णालय पण चांगले ठेवायला हवे.

रुग्णालयात झाडू मारल्यानंतर अधिष्ठाताना बेकार वाटत असेल तर त्या घाणीत येणाऱ्या रुग्णांना काय वाटते याचा विचार अधिष्ठाता यांनी करायला नको का ? जिथे नको तिथे जात काढू नये, पैसा खाताना जात आठवत नाही अन् कमजोर पडायला लागले की जात आठवते हा नालायकपणा आहे, असा संतापही कडू यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून आणण्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांचे नाव घेता वाघनखे हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वतः ला किती नखे आहेत हे त्यांनी पाहावे. ज्यांना नखे राहिली नाहीत त्यांनी वाघनखाबद्दल बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. बच्चू कडू हे महायुतीतील घटक पक्षापैकी एक असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना मंत्री दर्जा देण्यात आला आहे. मात्र मागील काही कालावधीपासून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. यामुळे बच्चु कडू यांनी भाजपची मिठी अफझलखानासारखी असल्याचे विधान केले. आता त्यांचे हे विधान भाजपच्या जिव्हारी लागणार असे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com