Sanjay Shirsat on cabinet expansion : गोगावलेंनी आशा सोडली, शिरसाटांना अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा...

Maharashtra Political News : माध्यमांकडूनही वारंवार मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? तुम्हाल संधी मिळणार का? असा प्रश्न विचारून डिवचले जात आहे.
Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडी पाहता कधी काय घडेल याचा नेम राहिलेला नाही. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात काय आले? अडीच वर्षात ते कोसळले आणि शिवसेनेत बंड झाले. (cabinet expansion) हे कमी कीय म्हणून राष्ट्रवादीतही फूट पडली. आधी डबल इंजिन सरकारमध्ये तिसरे इंजिन जोडले गेले. सत्तेतील वाटेकरी वाढल्याने शिंदे गटातील आमदारांची आणि खाती बदलल्यामुळे काही मंत्र्यांची घालमेल वाढली.

Sanjay Shirsat News
Nanded Loksabha Constituency : पाळजचा गणपती कोणाला पावणार ?...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे गेल्या अकरा महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्तार आणि त्याची चर्चा राज्यात सुरू आहे. (Shivsena) राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशानंतर दुसरा मंत्रीमंडळ विस्तार झाला खरा, पण तो फक्त अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांसाठीच होता. या विस्तारातही शिंदे गटाच्या इच्छूकांना वेटींगवर ठेवण्यात आले होते.

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दरम्यानच्या काळात मंत्रीमंडळ विस्ताराचे कितीतरी मुहूर्त सांगतिले. पण त्यातील एकही खरा ठरला नाही. सत्तेच्या भाकरीत राष्ट्रवादी वाटेकरी झाल्यामुळे शिंदे गटाला आपली भूक चतकोर भाकरीवरच भागवावी लागत आहे. विरोधी पक्षात असतांना ज्या अजित पवार यांनी संजय शिरसाट, भारत गोगावले व इतर मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्यांची भर सभागृहात टर उडवली होती, त्याच अजित पवारांनी सत्तेत आल्यानंतर ९ मंत्रीपद मिळवून त्यांच्या जखमेवर अजून मीठ चोळण्याचे काम केले.

आता काल झालेल्या पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अजित पवारांनी आपलीच दादागिरी सरकारमध्ये चालणार हे दाखवून दिले. त्यामुळे आता राहिलेल्या वर्षभरात शिंदे गटाच्या हाताला काही लागेल? असे तरी चित्र नाही. त्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे, एकीकडे लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार तर दुसरीकडे अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार.

पण अशा परिस्थितीतही आमदार संजय शिरसाट मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल, हे पालुपद लावायचे काही सोडत नाहीयेत. माध्यमांकडूनही त्यांना वारंवार मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? आणि तुम्हाल संधी मिळणार का? असा प्रश्न विचारून डिवचले जात आहे. शिंदे गटाचे मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या भारत गोगावले यांनी तर आता आपण मंत्री होऊ, अशी इच्छाच सोडली आहे. मी मंत्रीच नाही, तर पालकमंत्री कुठून होणार? या त्यांच्या विधानातून ते स्पष्ट होते. पण शिरसाटांचे मात्र `उम्मीद पे दुनिया कायम`, असे सुरूच आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com