शिवसेनेशी निष्ठा ठेवलेल्या आमदार बांगरांचे हिंगोलीत जल्लोषात स्वागत

आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांचे आज ( शुक्रवारी ) जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Santosh Bangar
Santosh BangarSarkarnama

हिंगोली - राज्यातील शिवसेनेचे आमदार भाजपच्या गोटात जात आहेत. त्यांच्यावर ईडीची भीती, पदाची लालसा, असे आरोप होत आहेत. अशा स्थितीत मात्र हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांनी मात्र शिवसेनेशी एकनिष्ठच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेने सोबत एकनिष्ठ राहणाऱ्या संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांचे आज ( शुक्रवारी ) हिंगोली जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ( MLA Bangar, who is loyal to Shiv Sena, is welcomed in Hingoli )

यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांचा सत्कार केला. शुक्रवारी सकाळी ते मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने परभणी रेल्वेस्थान येथे येताच येथे त्यांचे स्वागत झाले. तसेच हिंगोली जिल्ह्यात येताच ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Santosh Bangar
किती आले, किती संपले, शिवसेना आहे तिथेच आहे!

शिवसेनेत अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडे किती निष्ठावंत आमदार राहतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडलीच नाही. या संदर्भात अफवा देखील पसरल्या होत्या. मात्र आमदार बांगर यांनी आपण कुठेही जाणार नाही शिवसेना सोडणार नाही, असे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

शुक्रवारी सकाळी ते मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने परभणी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांचा सत्कार करण्यात आली. यावेळी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार, औंढा नागनाथ येथेही त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Santosh Bangar
video : परभणीत आमदार संतोष बांगर यांचे जोरदार स्वागत

त्यानंतर आमदार संतोष बांगर हिंगोली शहरात दाखल होताच शहरातील नांदेड नाका परिसरात शिवसैनिकांच्या वतीने फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी शिवसैनिकांना संबोधताना आमदार संतोष बांगर भावूक झाले होते. तसेच शिवसेना जिल्हा कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी चौकात देखील आमदार बांगर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्ह्यात पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com