Mla Dhiraj Deshmukh On Cricket : पाणीपुरी विकणाऱ्या `यशस्वी`, चा आदर्श डोळ्यासमोर ठेवा..

Marathwada : खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे; ते आता कमाईचे, करिअरचे माध्यम बनले आहे.
Mla Dhiraj Deshmukh On Cricket News
Mla Dhiraj Deshmukh On Cricket NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur News : राजकारण, निवडणुका, मतदान या पलीकडे जावून तरुणाईचा विचार झाला पाहिजे. (Mla Dhiraj Deshmukh On Cricket) त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना योग्य वेळेत, योग्य वयात प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही 'लातूर ग्रामीण'चे आमदार धिरज देशमुख यांनी दिली.

Mla Dhiraj Deshmukh On Cricket News
Radhakrishna Vikhe On Sand News : वाळू डेपोच्या कामात अधिकारी-ठेकेदारांचेच अडथळे, पण त्यांना सरळ करू...

खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे; ते आता कमाईचे, करिअरचे माध्यम बनले आहे. (Mla Dhiraj Deshmukh) त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी खेळाकडे वळावे, पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वीचा आदर्श घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

(Latur) राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या जयंतीचे औचित्य साधून उदगीर येथील शाळेच्या प्रांगणावर आजोजित 'लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10' स्पर्धेला भेट देवून धिरज देशमुख यांनी तरुण, खेळांडूंशी संवाद साधला.

त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत त्यांचा उत्साहही वाढवला. गुणवत्ता, इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर हमखास यश मिळते. त्यामुळे तरुणांनी यशस्वी जैसवाल यांचे उदाहरण समोर ठेवायला हवे. आझाद मैदानावर पाणीपुरी विकत त्यांनी आपला छंद जोपासला.

आता एक यशस्वी आणि महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या ग्रामीण भागातही क्रीडा क्षेत्रात टॅलेंट उपलब्ध आहे. त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, पाठबळ देणे महत्वाचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com