Marathwadad : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वाळू डेपोच्या कामात आमच्याच अधिकारी आणि त्यांचे संबंध असलेल्या ठेकेदारांचा अडथळा आहे. (Radhakrishna Vikhe On Sand News) पण त्या सगळ्यांना लवकरच सरळ करू, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच महसुल खात्याला इशारा दिला.
अवैध वाळू उपशाला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन बुकिंगनंतर १५ दिवसांत वाळू घरपोच मिळण्याचे हे धोरण आहे. यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होणार आहे. (Sandmafiya) नदीपात्र सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. वाळू तस्करीमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल, असेही विखे म्हणाले. मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. (Marathwada) राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. नदीपात्र सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. वाळू तस्करीमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल.
परंतु अजूनही सर्वत्र सरकारी वाळू डेपो सुरु झाले नाही.अधिकारी आणि वाळू ठेकेदार शासकीय वाळू डेपोसाठी अडथळे आणत आहेत. पण सरकार ठाम आहे, या कामाला थोडा वेळ लागेल पण हे होणारच आहे. या मार्गात जे आडवे येतील त्यांना आम्ही सरळ करू, महिन्याभरात सर्व सुरळीत होईल.
कोपरगावमध्ये तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. वाळूसाठी तो हफ्ता घेत होता, वाळूच्या बाबतीत आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात, याची आम्हाला लाज वाटते आहे. सरकारी वाळू डेपोसाठी प्रशासनातील या लोकांनी ठेकेदारांशी संगनमत केले आहे. परंतु त्यांना आता सरळ केले जाईल, असा इशारा देखील विखे यांनी यावेळी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.