Mla Bangar- MP Patil News : राज्यात नाही तर केंद्रात द्या, मंत्रीपदासाठी दंड थोपटले ...

Marathwada : हिंगोली जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
Mla Bangar- MP Patil News
Mla Bangar- MP Patil NewsSarkarnama

Shivsena : शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या आमदार, खासदारांचा संयम आता सुटत चालला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अचनाक झालेल्या एन्ट्रीने तर शिंदे गटाची अस्वस्थता जास्तच वाढली. (Mla Bangar- MP Patil News) आहे त्या मंत्र्यांची महत्वाची खाती बदलली जात असतांना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आता मंत्रीपदासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

Mla Bangar- MP Patil News
Atul Save-Ajit Pawar News : लांबलांब राहणाऱ्या सावेंचे अजित पवारांनी खातेच लांबवले...

राज्यात जमत नसेल तर केंद्रात मंत्रीपद द्या, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Hingoli) यांच्याकडे करणार आहोत, असे या दोघांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. यासाठी लवकरच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही या जोडीने स्पष्ट केले. शिंदे यांनी बंड पुकारले तेव्हा ठाकरेंशी एकनिष्ठ असलेलेले संतोष बांगर (Santosh Bangar) आश्चर्यकारकरित्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटात गेले होते.

त्यापाठोपाठ हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी देखील शिंदे गटात उडी मारली होती. पहिल्या मंत्रीमंडळापासून ते काल झालेल्या आणि बहुचर्चित विस्तारात देखील हिंगोलीला मंत्रीपद मिळण्याची कुठलीही चर्चा नव्हती. मात्र गेल्या महिन्यात संतोष बांगर यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यात आपल्याला शंभर टक्के मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला होता.

फडणवीस साहेबांनी आपल्याला तसे सांगितल्याचेही बांगर म्हणाले होते. आता मागून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना महत्वाची खाती मिळाल्यानंतर हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले पाहिजे, राज्यात शक्य नसले तर केंद्रात द्या, असा आग्रह बांगर-पाटील जोडीने धरला आहे. हिंगोली जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. राज्यात नाही तर केंद्रात मंत्री पद द्यावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्य कार्येकर्त्याची जाण आहे. त्यामुळे अन्याय होणार नाही, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.

मी परत सांगतो शंभर टक्के मंत्री पद मिळणार आहे. येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यावेळी नक्कीच विचार केला जाणार. राज्य मंत्री मंडळाचा सर्व समावेशक विस्तार आहे, हिंगोली मागास जिल्हा असल्यामुळे विकासासाठी मंत्री पद मिळावे अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसल्याने नाराजी असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. एकंदरित मंत्रीपदावरून आता आमदारांप्रमाणेच शिंदे गटाच्या खासदारांमधील नाराजी देखील समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com