Kailas Patil On Farmers: शेतकऱ्यांना दिलासा द्या, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका...

Affected Farmers News : धाराशिव जिल्ह्यातील सुमारे १,६६६ शेतकऱ्यांचे अनुदान सप्टेंबर महिना लोटत आला तरी शासनाकडून निधी न मिळाल्याने रखडले.
Mla Kailas Patil News
Mla Kailas Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Shivsena News : कधी अवकाळी, अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती अशा विविध संकटांचा सामना करत शेतकरी प्रत्येक हंगामाकडे डोळे लावून बसलेला असतो. पण त्याला निसर्गही साथ देत नाही आणि मायबाप सरकारही, अशीच काहीशी परिस्थिती आहे. (Farmers News) शेतकऱ्यांसाठी सरकारकडून घोषणा तर केल्या जातात, पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही, अशी टीका करत धाराशिवचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

Mla Kailas Patil News
Nanded BJP Politics : नांदेड लोकसभेची जागा राखण्याचे भाजपसमोर आव्हान, येणार काळ कसोटीचा..

फक्त घोषणा आणि आश्वासनंच जोरदार, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर रखडलेले अनुदान, नुकसानभरपाई व इतर मदतीवरून सरकारला सुनावले. (Kailas Ghadge Patil) महाविकास आघाडी सरकारने महात्मा जाेतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ दिला.

त्यानंतर दोन लाखांपर्यंत नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. (Marathwada) परंतु त्यानंतर सत्तेत आलेल्या या घटनाबाह्य सरकारने ३१ मार्च २०२३ पूर्वी पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची (Shivsena) अधिवेशनात घोषणा केली होती.

मात्र, धाराशिव जिल्ह्यातील सुमारे १,६६६ शेतकऱ्यांचे अनुदान सप्टेंबर महिना लोटत आला तरी शासनाकडून निधी न मिळाल्याने रखडले आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रोत्साहनपर अनुदान, सततच्या पावसाचे अनुदान, कांदा अनुदान यासाठी निधी उपलब्ध करून त्यांना दिलासा द्यावा, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

दरम्यान, नुकतेच जिल्ह्यातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पीकविमा कंपनीकडून मिळणारी ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाअखेरपर्यंत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांना दिले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com