Mla Meghna Bordikar News : लंडनमधील भारतीयांकडून आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर...

Marathwada : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.
Mla Meghna Bordikar News
Mla Meghna Bordikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर (Mla Meghna Bordikar) यांना जाहीर झाला आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमधील ब्रिटिश संसदेत 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये १२ मे रोजी एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत नियोजित आहे.

Mla Meghna Bordikar News
Protest Against Supply Officer: पाण्यात उभे राहत पुरवठा अधिकाऱ्याविरोधात आंदोलन..

विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. (Parbhani) आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, जलसंधारण आणि पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आहे. (Marathwada)

'दीपस्तंभ प्रतिष्ठान'च्या माध्यमातून आमदार मेघना बोर्डीकर यांनी पर्यावरण विषयक कामांना मोठ्या प्रमाणावर न्याय दिला. (Maharashtra) या माध्यमातून गावोगावी जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणावर काम त्यांनी उभे केले. त्यातून जलमित्र, जलदुतांची एक सक्रिय टीम या भागात उभी राहिली. अनेक ठिकाणचे पाणी प्रश्न तडीस नेत त्यांनी आपली कार्यकुशलता दाखवून दिली. जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यांनी आयोजित केलेले नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम व सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी केलेल्या भरीव कार्याची आणि अथक परिश्रमाची नोंद राज्यभर घेतली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे. या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील वीस देशातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरित करण्यात येणार आहे. मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो.

याआधी 'भारत गौरव पुरस्कार' आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारकर्त्यांच्या यादीत मेघना बोर्डिकर यांचे नाव असल्याने जिल्हाभरात कौतुक होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे नाव ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला, असेच म्हणावे लागेल. या पुरस्कारासाठीच्या निवडीमुळे बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com