Prashant Bamb News : मुख्यालयी नसणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करा; आमदार बंब यांचा शिक्षक दिनी निघणार मोर्चा !

Prashant Bamb News : शिक्षक त्यांच्या संघटनेच्या जोरावर कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाही.
Prashant Bamb News :
Prashant Bamb News : Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Smbhajinagar News : गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले आहे. शिक्षकांविरूद्ध आमदार बंब पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शिक्षक दिनीच शिक्षकांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा बंब यांनी दिला आहे.

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतनच बंद करण्याची मागणी बंब यांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटना आणि आमदार बंब यांच्यातला संघर्ष विकोपाला जाण्याचे चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

Prashant Bamb News :
Nana Patole News : पटोलेंच्या नावाने दोन वर्ष बिल न देता हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारला..; तोतया स्वीय सहायकाला अटक

आमदार प्रशांत बंब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "राज्यातील शिक्षक त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पडत नाहीत. मी विषयात वारंवार संपूर्ण राज्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि विशेषत: छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आणि संबंधित विविध अधिकाऱ्यांना एकूण १३ वेळा स्मरणपत्रे दिले आहे. मात्र यावर शिक्षक संघटना ऐकायलाच तयार नाहीत."

बंब पुढे म्हणाले, "एकूण १३ वेळा पाठवलेल्या या स्मरणपत्रांमध्ये मागणी केली आहे की, तुम्ही शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवून आणा, शिक्षक गावामध्ये मुख्यालयी राहायला हवेत, पण ते शिक्षक त्यांच्या संघटनेच्या जोरावर कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाहीत. याबाबत कुठेतरी वाचा फोडण्याची गरज आहे. म्हणून येत्या शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी मी, कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहे," असा इशारा बंब यांनी दिला आहे.

Prashant Bamb News :
MLA Europe Tour : राज्यातील सर्वपक्षीय २२ आमदार युरोपला जाणार; स्त्री सक्षमीकरणाचा अभ्यास करणार !

मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रं सादर करून घरभाडे घेतात, शासनाची फसवणूक करतात असा गंभीर आरोप प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी मागील पावसाळी अधिवेशनात केला होता. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो. शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे, असा मुद्दा बंब यांनी बोलून दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com