MLA Europe Tour : राज्यातील सर्वपक्षीय २२ आमदार युरोपला जाणार; स्त्री सक्षमीकरणाचा अभ्यास करणार !

Manisha Kayande MLA Europe Tour : अभ्यासातून आत्मसात केलेले ज्ञान संबंधित आमदार राज्याच्या महिला धोरणात समाविष्ट करतील
MLA Europe Tour
MLA Europe TourSarkarnama

Mumbai News : राज्यातील सर्वपक्षीय अशा एकूण २२ आमदारांचा युरोप दौरा होणार असल्याची माहिती मिळत आहे. युरोप खंडातील जर्मनी, नेदरलँड आणि इंग्लंड या प्रगत देशांमध्ये या आमदारांचा अभ्यास दौरा असणार आहे. या दौऱ्यात स्त्रियांचे सामाजिक प्रश्नांवर अभ्यास केला जाणार आहे. यामुळे हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. (Latest Marathi News)

MLA Europe Tour
Thackeray Review Meeting: वर्धा, रामटेक, यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी ठाकरे आखणार रणनीती ? गुरुवारी बोलावली आढावा बैठक

आमदारांच्या या अभ्यास दौऱ्यात स्त्री-सबलीकरणावर भर असणार आहे. मुख्यत: स्त्री-पुरूष समानता, महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर आमदारांकडून अभ्यास केला जाईल. तब्बल १० दिवस २२ आमदार युरोप दौऱ्यावर असतील. या अभ्यासातून आत्मसात केलेले ज्ञान संबंधित आमदार राज्याच्या महिला धोरणात समाविष्ट करतील, अशी शक्यता आहे.

MLA Europe Tour
Praful Patel News : '' आघाडी सरकारमध्ये आम्ही सत्तेत होतो, पण...''; प्रफुल्ल पटेलांचा शिवसेनेबाबत खळबळजनक दावा

या दौऱ्यात नेमक्या कोणकोणत्या आमदारांचा समावेश आहे, याची अजूनही सविस्तर माहिती मिळू शकली नसली तर, या सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातून आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यात एकूण २२ आमदार तब्बल दहा दिवस अभ्यास दौरा करणार आहेत . (Maharashtra MLA Europe Tour)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com