Eknath Shinde: जिल्हाधिकाऱ्यांसाठी गुड न्यूज: मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Satara News: मुख्यमंत्री यांचे 10 जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावर मोठ- मोठे स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnma
Published on
Updated on

Satara: सातारा जिल्ह्यातील नियोजन आराखड्यातून जिल्ह्यातील प्रांत आणि तहसीलदार यांना स्कार्पिओ गाड्याचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आता लवकरच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाही नव्या इनोव्हा गाड्या देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

पाटण तालुक्यातील वरचे आंबेघर, खालचे आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिंद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), काहीर या गावात 2021 साली झालेल्या भूस्खलन बाधित गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री यांचे 10 जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावर मोठ- मोठे स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते. तर कार्यक्रमस्थळी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे झेंडेही लावण्यात आले होते. 

Eknath Shinde News
Internation Womens Day: 'या' आहेत भारतीय राजकारणातील सर्वाधिक शक्तीशाली महिला

लोकांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगले वाहने असतील तर ते अधिकारी चांगले काम करतील. आमचं सरकार लोकाभिमुख आहे. मल्हारपेठ येथे पोलिसांना घरे देण्यात आली असून तेथील पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचेही आँनलाईन उद्धघाटन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील प्रांत आणि तहसिलदार यांना नव्या 20 स्कार्पिओचे वितरण धावडे येथे करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आता राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाही नव्या कोऱ्या इनोव्हा गाडी मिळणार असल्याची घोषणा केल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून स्वागत केले जात आहे.

सीएम म्हणजे कॉमन मॅन

मी तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. कालही, आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करेन. सीएम म्हणजे चीफ मिनीस्टर नव्हे तर मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. सर्वसामान्य माणसांची दुः ख जाणायची असेल तर त्याच्यात जावे लागेल. त्यामुळे मी सतत लोकांच्यात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

पती-पत्नी सेवा योजनेचा लाभ 

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल हे पती- पत्नी असून एकाच जिल्ह्यात काम करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी त्याच्या शेजारी काही अंतरावर असलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री म्हणाले, बघा पती- पत्नी एकत्रित सेवा योजनेचा लाभही आम्ही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com