Mla Satish Chavan Visit Lake News
Mla Satish Chavan Visit Lake NewsSarkarnama

Mla Satish Chavan News : डमडम तलावातील बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यात मोबदला देणार..

Ncp : १३३ एकरावरील हा तलाव अतिपावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतात साचते.

Marathwada : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या तलाववाडी येथील शिवकालीन डमडम तलावामुळे बाधित होणार्‍या क्षेत्राची मोजणी उपअधीक्षक, भूमी अभिलेख खुलताबाद यांच्या कार्यालयाकडून एका महिन्याच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षण करून बाधित शेतकर्‍यांना तीन महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल. अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज विधान परिषदेत केली.

Mla Satish Chavan Visit Lake News
Diliprao Deshmukh News : राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ञ संचालकपदी दिलीपराव देशमुख..

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी ५ फेब्रुवारी रोजी डमडम तलावास भेट देऊन तलावातील पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या भेट घेतली होती. (Marathwada) तसेच बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज चव्हाण यांनी विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

१३३ एकरावरील हा तलाव अतिपावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या शेतात साचते. त्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बाधित जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी सदरील शेतकरी मागील १० वर्षांपासून शासन दरबारी पाठपूरावा करत असल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे शासनाने तलावातील बाधित शेतकर्‍यांच्या जमिनीचे त्वरित भूसंपादन करावे, व याचा निर्णय आजच जाहीर करावा, अशी आग्रही मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिले.

सदर तलावामुळे बाधित होणार्‍या क्षेत्राची मोजणी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खुलताबाद यांच्या कार्यालयाकडून एका महिन्याच्या आत केली जाईल. सर्वेक्षण करून बाधित शेतकर्‍यांना तीन महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून डमडम तलावातील बाधित शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com