MNS : ठाकरेंच्या सभेआधीच भाजप नेत्यांच्या हाॅटेलात भेटीगाठी सुरू...

राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला भाजपचे पाठबळ आहे, अशी चर्चा व विरोधकांकडून आरोप होत असतांना भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना अधिकच धार आली. (MNS)
Kenekar-Ghuge-Thackeray
Kenekar-Ghuge-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेआधीच इकडे हाॅटेलमध्ये भाजप व मनसे नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. (MNS) १ मे म्हणजेच उद्या महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होत आहे. या सभेसाठी मनसेचे प्रमुख नेते आज शहरात दाखल झाले आहेत. तर बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे हे गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात ठाण मांडून आहेत. काल रात्री मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील शहरात दाखल झाले.

आज दुपारी त्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश त्यांच्या उपस्थितीत मनसेत झाला. त्यानंतर ते हाॅटेलमध्ये परतले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी स्थानिक भाजपचे (Bjp) नेते, पदाधिकारी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Marathwada) भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांचे पुत्र हर्षवर्धन व अन्य पदाधिकाऱ्यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अमित ठाकरे यांची भेट घेतली.

भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री प्रवीण घुगे हे देखील यावेळी उपस्थिती होते. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये भाजपच्या नेत्यांच्या गाड्या दाखल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला भाजपचे पाठबळ आहे, अशी चर्चा व विरोधकांकडून आरोप होत असतांना भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना अधिकच धार आली.

Kenekar-Ghuge-Thackeray
Aurangabad : पाय अडकून कोसळणाऱ्या कॅमेरामनला अमित ठाकरेंनी सावरले..

प्रसार माध्यमांशी बोलतांना भाजपचे शहराध्यक्ष केणेकर यांनी मात्र आपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मुलांच्या रिसेप्शनची पत्रिका देण्यासाठी अमित ठाकरे यांना भेटलो असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com