Raj Thackeray

Raj Thackeray

sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र अंबानी अन् त्यांच्याच मित्राने घराखाली स्फोटके ठेवली!

घोट्याळ्या प्रकरणी मला कोणाच्या घरात डोकावून बघायचे नाही.

औरंगाबाद : निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) काय करतात मला माहित नाही. सचिन वाझे शिवसेनेच्या कार्याध्यक्षांच्या खूप जवळचे आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खूप जवळचे मित्र आहेत. मग एक जवळाचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घरासमोर स्फोटके का ठेवली हे मला अजूनपर्यंत कळालेले नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

<div class="paragraphs"><p>Raj Thackeray</p></div>
शंभर कोटींची वसुली सांगितली का? वाझेनं अखेर देशमुखांसमोरच दिलं उत्तर

राज ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टिका केली. तसेच सचिन वाझे प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. घोट्याळ्या प्रकरणी मला कोणाच्या घरात डोकावून बघायचे नाही, असेही ठाकरे म्हणाले. राज्य सरकार काहीही करण दाखवून निवडणुका पुढे ढकलण्याचे कारण शोधत आहे, असा आरोप त्यांनी केला.

रस्त्यामध्ये खड्डे नसतील तर चांगली गोष्ट आहे. लोक राग व्यक्त करत नाही तोपर्यंत काही बदल होणार नाही. लोकांनी राग व्यक्त केला पाहिजे. यावेळी ठाकेर यांनी अगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार का असा प्रश्वा विचारला असता ते म्हणाले, युतीचे नंतरपाहू आता मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजीनगर करण्याबाबत मी काहीच बोलणार नाही, जाहीर सभा घेऊन बोलेल, असेही ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Raj Thackeray</p></div>
वानखेडे आता संजय राऊतांच्या व्याह्याच्या रडारवर; कारणे दाखवा नोटीस बजावली

एस. टी कर्मचाऱ्यांना 4-4 महिने पगार का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. तुमचे लक्ष मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे वळवणे एव्हढाच उद्योग सध्या चालू आहे. एस.टी चा भ्रष्टाचार थांबला तर एस. टी खूप फायद्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले. एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत, ते अंगावर आले तर सरकार काय करणार, असा सवालही ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com