शंभर कोटींची वसुली सांगितली का? वाझेनं अखेर देशमुखांसमोरच दिलं उत्तर

चांदीवाल समितीसमोर अनिल देशमुख आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची समोरासमोर झाडाझडती घेण्यात आली.
Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin WazeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज देशमुख आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sahin Waze) यांची समोरासमोर झाडाझडती घेण्यात आली.

चांदीवाल समितीसमोर अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची समोरासमोर झाडाझडती घेण्यात आली. देशमुख याच्याकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून कोणती डिमांड करण्यात आली होती का? यावर वाझेने नाही, असे उत्तर दिले. देशमुखांकडून अधिकृत किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीनी पैशांची डिमांड केलेली नव्हती, असेही त्याने स्पष्ट केले. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातून बारमालकांकडून पैसे उकळण्यास करण्यास सांगितल्याचे आठवत नाही, असेही त्याने सांगितले. बार मालकांकडून पैसे उकळल्याचाही वाझेने इन्कार केला.

Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांना चिरडणं पूर्वनियोजितच! एसआयटीच्या तपासात बाब उघड

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
वानखेडे आता संजय राऊतांच्या व्याह्याच्या रडारवर; कारणे दाखवा नोटीस बजावली

चांदीवाल चौकशी समिती अनिल देशमुख, गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसह या प्रकरणाशी निगडित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहे. या चौकशीत देशमुख अथवा अधिकारी-कर्मचारी दोषी आढळल्यास ही समिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणांकडे हा तपास सोपवण्याची शिफारस करणार आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच, गृह विभागाशी संबंधित शिफारशीही ही समिती करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com