Ambadas Danve On Amit Saha News : आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्या भाजपने फारूख, मेहबुबाशी युती करून कोणतं हिंदुत्व साधलं..

Bjp : २०२४ लोकसभेपुर्वी यांच्यापैकी कोणी गळाला लागतो का, याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरूच आहेत.
Ambadas Danve On Amit Saha News
Ambadas Danve On Amit Saha News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : नांदेड येथे झालेल्या संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थितीत केले. यावरून आता दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Ambadas Danve On Amit Saha News) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांना भाजपने आतापर्यंत युती केलेल्या देशातील नेत्यांची यादी देत तुम्ही कोणतं हिंदुत्व साधलं असा रोखठोक सवाल केला आहे.

Ambadas Danve On Amit Saha News
Sanjay Shirsat On Shivsena (UT) News : भाजपने ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्याचे मान्य केले होते, पण पवारांनी गुगली टाकली..

दानवे यांनी या संदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, युती तोडून (Shivsena) शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधक सातत्याने आमच्यावर करतात. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Saha) पण बोलले. मग ज्यांचे नाव मी खाली देतोय, यांच्याशी युती करून भाजपने कोणतं हिंदुत्व साधलं होतं?

फारुख अब्दुल्ला (यांचा मुलगा वाजपेयी सारकरमद्धे केंद्रीय मंत्री होता), मेहबूबा मुफ्ती, अकाली दल, ओम प्रकाश चौटला, मायावती (भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री), (Bjp) नितीश कुमार, ममता बॅनर्जी, (भाजप सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले), नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा यांचा जनता दल.

अजून साधारण २० नावं आहेत माझ्याकडे ! २०२४ लोकसभेपुर्वी यांच्यापैकी कोणी गळाला लागतो का, याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरूच आहेत. महाराष्ट्रात मात्र ही डाळ शिजणार नाही. सेक्युलर चेहरे असलेल्या लोकांशी हे देशभर युती करत फिरणार, पण यांचं हिंदुत्व शाबूत, अन आम्हीच सोडलं म्हणता. असं कसं चालेल? असा सवाल देखील दानवे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.