Marathwada News : विधीमंडळ अधिवेशनाला शनिवार, रविवारी सुटी असल्यामुळे मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. कृषीमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन असलेल्या धनंजय मुंडे यांनी देखील ही सुटी कारणी लावत आपल्या मतदारसंघातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. (Dhnanjay Munde News) जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून बांधावर जात त्यांनी सोयाबीन, कापूस व इतर पिकांची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली.
राज्यातील घडामोडी आणि त्यानंतर सत्तेतील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मिळाली. (Dhnanjay Munde) कृषीमंत्रीपद मुंडेच्या रुपाने पुन्हा मराठवाड्याकडेच आले. (Beed News) राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातलेला असतांना मराठवाडा मात्र अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.
अशावेळी मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्याच व्यक्तीकडे कृषीमंत्रीपद आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (Farmers) पहिल्याच अधिवेशनात कृषीमंत्री म्हणून मुंडे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना दिलेले उत्तरं आणि मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा दिलेला शब्द पाहता मुंडे शेतकऱ्यांच भलं करतील असं बोलल जात आहे.
आज परळी वैद्यनाथ तालुक्यातील बेलंबा, वाघबेट शिवारातील गोगलगायींनी बाधित सोयाबीन, कपाशी आदी पिकांची पाहणी त्यांनी केली. गोगलगायींमुळे होत असलेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले जावेत, याबाबत संबंधितांना आदेशही दिले. त्याचबरोबर गोगलगायींना नष्ट करण्यास उपयुक्त असणारी औषधे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी विभागास उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना दिल्या.
यावर्षी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीची गरज भासल्यास किंवा अन्य कोणत्याही अडचणीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देखील मुंडे यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.