भाषणात अडथळा आणणाऱ्या अभिमन्यू पवारांना देशमुखांनी दिल्या मंत्रीपदासाठी शुभेच्छा..

साखर निर्यात करतांना आपल्याला जेव्हा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांशी स्पर्धा करावी लागेल, तेव्हा आपण मागे राहता कामा नये. (Amit Deshmukh)
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Mumbai
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, MumbaiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आमदार अमित देशमुख हे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असतांना औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार हे मध्येच अडथळा आणत होते. यावर (Amit Deshmukh) अमित देशमुखांनी अभिमन्यू पवारांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या दालनात बसून माझे भाषण, विचार ऐकत असतील. तुम्ही घेत असलेले आक्षेपही पाहत असतील, त्यामुळे येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात तुम्हालाही मंत्रीपद मिळो, यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा, असा चिमटा देशमुख यांनी काढला. तेव्हा अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी देखील त्यांना हात जोडले.

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या विरोधातील प्रस्तावाचे समर्थन करतांना अमित देशमुख यांनी अनेक मुद्यांना हात घालत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. (Marathwada) मराठवाडा वाॅटरग्रीड, साखर निर्यातीचे धोरण, महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात केलेले काम, त्यावर झालेला खर्च याची श्वेतपत्रिका सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली. महाराष्ट्रात व देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झालेले आहे, त्यामुळे साखर निर्यातीचे धोरण लवकरच ठरवावे लागेल, याकडे देशमुखांनी सभागृहात उपस्थित कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधले.

अमित देशमुख म्हणाले, साखर निर्यातीचे धोरण ठरवणे गरजेचे आहे, राज्यात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे साखर निर्यात करतांना आपल्याला जेव्हा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांशी स्पर्धा करावी लागेल, तेव्हा आपण मागे राहता कामा नये. म्हणून आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन एक शिष्टमंडळ दिल्लीत संबंधित खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे जावे आणि लवकरात लवकर साखर निर्यातीचे धोरण ठरवावे, अशी मागणी देशमुखांनी केली.

Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Mumbai
Ashok Chavan : लग्नासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, अन् वरदक्षिणा म्हणून महाविद्यालयाला मदत..

देशमुख बोलत असतांना आमदार अभिमन्यू पवारांनी त्यांना मध्येच अडथळा आणला. तेव्हा देशमुखांनी त्यांना टोला लगावला. आताच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसले तरी पुढील विस्तारात तुम्हाला मंत्रीपद मिळो, अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा असल्याचे देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com