Marathwada Shivsena News : ठाकरे गटाची 'होऊ दे चर्चा', शिंदेंच्या सेनेची चर्चाच नाही...

Marathwada Political News : आमदार अपात्रतेच्या कारवाईचा धसका शिंदेंच्या शिलेदारांनी घेतला की काय? अशी चर्चा.
Marathwada Shivsena News
Marathwada Shivsena News Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : चाळीस आमदार आणि काही अपक्षांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला. शिवसेना पक्ष फुटीला उठावाचे नाव देत याची चर्चा जगभरात झाल्याचा दावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून केला. (Shivsena) पण जगभरात चर्चा झालेल्या शिंदे व त्यांच्या सेनेची राज्यात मात्र फारशी चर्चा आता होताना दिसत नाही.

Marathwada Shivsena News
Prithviraj Chauhan News : सगळं विचित्र चाललंय, हे सरकारच जनतेनं हाकलून दिलं पाहिजे; पृथ्वीबाबांचा संताप

सत्ता गेली, पक्ष फुटला, नाव आणि चिन्ह जाऊनही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेची मात्र राज्यभरात 'होऊ दे चर्चा' सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री पद, सत्ता असूनही शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये फारसा उत्साह दिसत नाही. या उलट विरोधी पक्षात असूनही ठाकरे गट आक्रमक होऊन केंद्र आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या `होऊ दे चर्चा`, या कार्यक्रमांना सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद राज्यात, मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळत आहे.

या उलट शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या गोटात मात्र सध्या शांतता आहे. राज्यात १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. (Shivsena) सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावल्यानंतर आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग द्यावा लागणार आहे. कदाचित याचे टेन्शन शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांना आल्याचे दिसते. ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे महायुतीतले भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आपले अस्तित्व दाखवण्यात यशस्वी ठरत आहे, पण राज्याची धुरा हाती असूनही शिंदे आणि त्यांची सेना बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांना उमेदवारी मिळणार का? ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला लढण्याची संधी भाजप देणार का? या सगळ्याच प्रश्नावर गोलमोल भूमिका घेतली जात आहे. एकीकडे भाजप शिंदे गटाने २२ जागांवर केलेला दावा खोडून काढत आहे.

तर मुख्यमंत्री आपल्या खासदारांना कामाला लागा, उर्वरित ९ लोकसभा मतदारसंघातही आपणच लढणार, असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यांच्या या दाव्यानंतरही शिंदे सेनेत फारसा उत्साह दिसून येत नाही. शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट जे रोज माध्यमांना प्रतिक्रिया देऊन आक्रमकपणे बोलतात, तेही गेल्या आठवडाभरापासून कुठे दिसेनासे झाले आहेत. त्यांनीही आता आपला मतदारसंघ भला, अशी भूमिका घेतल्याचे दिसते आहे. संघटनात्मक पातळीवरही शिंदे गटात मराठावाड्यात फारसा उत्साह दिसत नाही. आमदार अपात्रतेच्या कारवाईचा धसका शिंदेच्या शिलेदारांनी घेतला की काय? अशी चर्चा मात्र त्यांच्याबातीत होताना दिसते आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com